LSG vs KKR highlights, IPL 2024 : केकेआरचा 98 धावांनी लखनऊवर दणदणीत विजय

LSG vs KKR Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 54 व्या सामन्यात आज लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders) या दोघं संघात सामना होणार आहे.

LSG vs KKR highlights, IPL 2024 : केकेआरचा 98 धावांनी लखनऊवर दणदणीत विजय

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Match  Live Score in Marathi: आज आयपीएलच्या 54 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स (LSG) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने सामने असणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करणार आहे. तर केएल राहुल (KL Rahul) एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बलाढ्य कोलकातासमोर लखनऊ आपल्या होमग्राउंडवर बाजी मारणार की नाही?

5 May 2024, 21:52 वाजता

दुसऱ्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर लखनऊचा युवा फलंदाज अर्शिन कुलकर्णी हा 9 धावांवर आउट झाला आहे. तर पहिल्या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजी करण्यासाठी आला आहे.

5 May 2024, 21:27 वाजता

20 ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सने, लखनऊ सुपर जाएंट्ससमोर 236 धावांचे लक्ष दिले आहे. फलंदाजीत केकेआरकडून सुनील नरेन याने सर्वात जास्त 81 धावा केल्या आहेत, तर फिलीप सॉल्ट आणि अंगक्रिस रघुवंशी या दोघांनी 32 धावांचे योगदान दिले आहे. लखनऊकडून गोलंदाजीत नवीन उल हक याने 3, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि युद्धवीर सिंग चरक या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत.

तर आता बघण्यायोगय गोष्ट असणार की, लखनऊची घातक फंलदाजी 236 धावांच्या लक्षाला कोलकाताच्या चांगल्या गोलंदाजीसमोर 20 ओव्हरमध्ये चेस करू शकणार की नाही.

 

 

 

 

5 May 2024, 20:57 वाजता

16 व्या ओव्हरमध्ये युद्धवीर चरक याने, अंगक्रिश रघुवंशीला 32 धावांवर आउट केलं आहे. चौथ्या विकेटनंतर श्रेयस अय्यर हा फलंदाजीसाठी आलायं.

5 May 2024, 20:50 वाजता

15 व्या ओव्हरमध्ये नवीन उल हकच्या ओव्हरमध्ये आंद्रे रसल हा 12 धावांवर आउट झाला आहे. तिसऱ्या विकेटनंतर रिंकू सिंग हा फलंदाजीसाठी आलाय, तर 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर 171-3 असा आहे.

5 May 2024, 20:33 वाजता

12 व्या ओव्हरमध्ये, लखनऊचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याने घातक दिसत असणाऱ्या सुनील नरेन याला 81 धावांवर आउट केलं आहे. सुनील नरेनच्या विकेटनंतर आंद्रे रसल हा फंलदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 20:20 वाजता

केकेआरकडून सुनील नरेन याने 27 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर 10 ओव्हरच्या , समाप्तीनंतर केकेआरचा स्कोर 110-1 असा आहे.

5 May 2024, 20:01 वाजता

6 ओव्हरनंतर कोलकाता नाईट रायडर्सचा स्कोर 70-1 असा आहे. सुनील नरेन हा 31 धावांवर खेळतोय, तर रघुवंशी हा 6 धावांवर त्याचे साथ देत आहे.

5 May 2024, 19:55 वाजता

5 व्या ओव्हरमध्ये, नवीन उल हकच्या गोलंदाजीवर घातक दिसत असणारा केकेआरचा फलंदाज फिल सॉल्ट हा 32 धावांवर आउट झाला आहे. तर पहिल्या विकेटनंतर अंगक्रिश रघुवंशी हा फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 19:17 वाजता

LSG vs KKR toss update : लखनऊ सुपर जाएंट्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

LSG प्लेइंग 11 -

केएल राहुल (C/W), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, यश ठाकूर

KKR प्लेइंग 11 - 

फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (C), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा

5 May 2024, 18:37 वाजता

KKR vs LSG हेड टू हेड

आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स पूर्णपणे कोलकाता नाईट रायडर्सवर वर्चस्व गाजवलं आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 4 सामने झाले आहेत. लखनऊ हे तीन सामने जिंकले आहेत. केकेआरने फक्त एक सामना जिंकलेला आहे. एलएसजीविरुद्ध केकेआरची सर्वोच्च धावसंख्या 208 आहे. तर, केकेआरविरुद्ध एलएसजीची सर्वोत्तम धावसंख्या 210 धावा आहे.