LSG vs PKBS Live Score : लखनऊची पंजाबवर 21 धावांनी मात

LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊ सुपर जाएंट्स आपला आयपीएल 2024 चा दुसरा सामना आपलं होमग्राउंड मानल्या जाणाऱ्या लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. 

LSG vs PKBS Live Score : लखनऊची पंजाबवर 21 धावांनी मात

Lucknow Super giants vs Pujab Kings score updates : एलएसजीने आतापर्यंत फक्त एक मॅच खेळलेली आहे आणि त्यात पण लखनऊला पराभव पत्करावा लागला होता. आता लखनऊ आज होम कंडिशन्सचा फायदा घेऊ शकणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंजाब किंग्स दुसऱ्या बाजूला दोनपैकी एक मॅच जिंकत पॉईंट्स टेबलच्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर पंजाबसमोर आज लखनऊचं कडवं आव्हान असणार आहे आणि आजची मॅच जिंकून पॉईंट्स टेबलवर वरचे स्थान मिळवण्याची खूप चांगली संधी सुद्धा आज पंजाबकडे आहे.

30 Mar 2024, 23:21 वाजता

मयंक यादव आणि मोहसिन खानच्या घातक गोलंदाजीमूळं लखनऊ सूपर जाएंट्सच्या संघाने पंजाब किंग्सवर 21 धावांनी सहज विजय नोंदवला आहे.

30 Mar 2024, 23:00 वाजता

मोहसीन खानने 17 व्या ओव्हरीत बॅक-टू-बॅक विकेट घेत लखनऊचे पारडं जड केलं आहे, आणि पंजाबच्या टीमला कठिण परिस्थितीत टाकलं आहे. मोहसिन खानने  एकाच ओव्हरमध्ये धवन आणि करण या दोघं महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहे

30 Mar 2024, 22:54 वाजता

मयंक यादव लखनऊसाठी उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे, पंजाबच्या जितेश शर्माला मयंक यादवने आपल्या गतीच्या जाळ्यात फसवून 16 व्या ओव्हरीत बाद केलं आहे. 

30 Mar 2024, 22:46 वाजता

15 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर आहे, 136-2, शिखर धवनने पंजाबची एक बाजू सांभाळून ठेवली आहे, तर त्याचा साथ द्यायला जितेश शर्मा आहे.

30 Mar 2024, 22:39 वाजता

मयंक यादवने परत एकदा लखनऊच्या संघाला मॅचमध्ये परत आणलं आहे. 14 व्या ओव्हरमध्ये मयंकने प्रभसिमरन सिंगला बाद केले

30 Mar 2024, 22:31 वाजता

12 व्या ओव्हरमध्ये लखनऊच्या यूवा गोलंदाज मयंक यादवने जॉनी बेअरस्टोला 42 धावांवर कॅच आऊट केले. 12 व्या ओव्हरनंतर पंजाबची 107-1 ही स्थिती आहे.

30 Mar 2024, 22:19 वाजता

10 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोर 98-0 पोहोचला आहे. धवन आणि बेयरस्टो यांच्यातील भागीदारी लखनऊसाठी डोके-दूखी ठरत आहे, अशातच लखनऊच्या टीमला ही भागीदारी तोडणं महत्वाच झालेलं आहे.

30 Mar 2024, 22:14 वाजता

इनिंगच्या आठव्या ओव्हरमध्ये शिखर धवनने 31 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं आहे. धवनसोबत जॉनी बेअरस्टोसुद्धा 36 धावांंवर खेळत आहे. या भागीदारीमूळे पंजाब मजबूत स्थितीत आली आहे.

30 Mar 2024, 21:53 वाजता

5 ओव्हरनंतर पंजाबकडून बेअरस्टो-धवनच्या जोडीने संघाला ताबडतोब सुरूवात दिली आहे. धवन 26 तर बेअरस्टो 19 वर खेळत आहे. एकही विकेट न गमावता पंजाबने 45 रन्स बनवले आहेत. 

30 Mar 2024, 21:28 वाजता

20 ओव्हरच्या समाप्तीनंतर लखनऊने 199 धावांपर्यंत मजल मारली आहे. लखनऊकडून डिकॉकने 54, पूरनने 42 तर इतर फलंदाजांनीसुद्धा आपले योगदान दिलं. पंजाबच्या गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंगने 2, सॅम करणने 3 आणि रबाडा आणि चहरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे. 

लखनऊच्या फलंदाजांनी पावरप्लेमध्ये चांगल्या पद्धतीची सुरूवात केली, पण मधल्या ओव्हर्समध्ये थोडी फलंदाजी डामाडोल झाली होती. त्या परिस्थितीतून पूरनने लखनऊला सावरले आणि शेवटी कृणालने शेवटी येऊन मोठे फटके मारले आणि लखनऊला आव्हानात्मक धावांपर्यंत पोहोचोवले. आता बघण्यायोग्य असेल की, पंजाब आज आपला दूसरा विजय नोंदवते की, लखनऊ पंजाबला घरच्या मैदानावर पराभूत करते?