24 कोटी फिटले! गोळीच्या स्पीडने टाकलेल्या बॉलवर हेडच्या उडाल्या दांड्या, स्टार्कचा नाद खुळा; पाहा Video

Mitchell Starc Bowled Travis Head : केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात (KKR vs SRH) मिचेल स्टार्कने घातक अशा ट्रेविस हेडला माघारी पाठवलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

सौरभ तळेकर | Updated: May 21, 2024, 09:57 PM IST
24 कोटी फिटले! गोळीच्या स्पीडने टाकलेल्या बॉलवर हेडच्या उडाल्या दांड्या, स्टार्कचा नाद खुळा; पाहा Video title=
Mitchell Starc Bowled Travis Head

KKR vs SRH, Michel Starc Bowled Travis Head Video: आयपीएल 2024 फायलनचं तिकीट मिळवण्यासाठी आता कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघात फाईट होत आहे. आजचा सामना जिंकून थेट फायनलमध्ये जाऊन बसण्याचं सुख घेण्यासाठी दोन्ही संघ संपूर्ण ताकद लावत आहे. अशातच आता केकेआरला साखळी सामन्यात ज्याची चिंता ती आता मिटली आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात (KKR vs SRH) मिचेल स्टार्कने घातक अशा ट्रेविस हेडला माघारी पाठवलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. गोळीगत आलेल्या बॉलवर खरतनाक फॉर्ममध्ये असलेल्या ट्रेविड हेडची विकेट पडली.

सामन्यापूर्वी केकेआरला चिंता होती ती हैदराबादच्या सलामीवीरांची... केकेआरने आपला 24.75 कोटींचा खेळाडू मिशेल स्टार्क याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली होती. मिशेल स्टार्कने आपल्या भेदक गोलंदाजीची ताकद दाखवली अन् ट्रेविड हेडला माघारी पाठवलं. हेडला भोपळा देखील फोडता आला नाही. तर स्टार्कने नितीश रेड्डीला देखील तंबूत धाडलं. त्याचबरोबर शाहबाद अहबादच्या देखील दांड्या स्टार्कने उडवल्या. 

पाहा Video

अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी यंदा सनरायझर्स हैदराबादसाठी खूप धावा केल्या आहेत. दोघांनी मिळून 1000 धावा जोडल्या आहेत. अभिषेकने 467 धावा केल्या आहेत, तर ट्रॅव्हिस हेडने 533 धावा केल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन: पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.

सनरायझर्स हैदराबाद इम्पॅक्ट प्लेअर्स: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि जयदेव उनाडकट.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

कोलकाता नाइट रायडर्स इम्पॅक्ट प्लेअर्स : अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत आणि शेरफेन रदरफोर्ड.