LSG vs PKBS Live Score : लखनऊची पंजाबवर 21 धावांनी मात

LSG vs PBKS, IPL 2024 : लखनऊ सुपर जाएंट्स आपला आयपीएल 2024 चा दुसरा सामना आपलं होमग्राउंड मानल्या जाणाऱ्या लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाणा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. 

LSG vs PKBS Live Score : लखनऊची पंजाबवर 21 धावांनी मात

Lucknow Super giants vs Pujab Kings score updates : एलएसजीने आतापर्यंत फक्त एक मॅच खेळलेली आहे आणि त्यात पण लखनऊला पराभव पत्करावा लागला होता. आता लखनऊ आज होम कंडिशन्सचा फायदा घेऊ शकणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंजाब किंग्स दुसऱ्या बाजूला दोनपैकी एक मॅच जिंकत पॉईंट्स टेबलच्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर पंजाबसमोर आज लखनऊचं कडवं आव्हान असणार आहे आणि आजची मॅच जिंकून पॉईंट्स टेबलवर वरचे स्थान मिळवण्याची खूप चांगली संधी सुद्धा आज पंजाबकडे आहे.

30 Mar 2024, 21:09 वाजता

पंजाबच्या सॅम करणच्या 19 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट पटकावल्या आहेत, बदोनी आणि बिश्नोईला तंबूत परत धाडले आहे आणि लखनऊचा स्कोर आहे 191-7

30 Mar 2024, 20:46 वाजता

16 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा स्कोर 146/5 असा आहे. निकोलस पूरन 21 बॉलमध्ये 42 रन बनवून आऊट झाला आहे. पूरनच्या जागेवर क्रृणाल पांड्या हा बॅटिंगसाठी मैदानात आला आहे. 

30 Mar 2024, 20:41 वाजता

14 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा सेट बॅट्समन डिकॉक हा 54 धावा बनवून अर्शदीपच्या गोलंदाजीवर आऊट झाला आहे.

30 Mar 2024, 20:34 वाजता

लखनऊचा स्टार ओपनर क्विंटन डिकॉकने 13 व्या ओव्हरमध्ये 34 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले आणि लखनऊला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले आहे.

30 Mar 2024, 20:20 वाजता

10 व्या ओव्हरनंतर लखनऊची चिंता थोडी वाढलेली आहे, कारण लखनऊचे तिन महत्वाचे फलंदाज तंबूत परतलेले आहे, सध्या डिकॉकने एक बाजू सांभाळून ठेवलीये आणि कॅप्टन निकोलस पूरण बॅटिंगसाठी आला आहे. एलएसजी 10 ओव्हरनंतर 88-3 च्या स्थितीत आहे.

30 Mar 2024, 20:13 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये राहूल चहरने तडाखेदार फलंदाज मार्कस स्टॉइनिसला 19 रनांवर बोल्ड केलं आहे. राहूल चहरने या ओव्हरमध्ये दोन छक्के खाऊन शेवटी मात्र चौथ्या बॉलवर स्टॉइनिसला बाद केलं.

30 Mar 2024, 19:55 वाजता

सहाव्या ओव्हरमध्ये देवदत्त पडिकल हा सॅम करणच्या बॉलिंगवर आऊट झाला आहे. 5.1 ओव्हरनंतर एलएसजीचा स्कोर आहे 45-2 आणि या विकेटनंतर मार्कस स्टॉयनिस हा फलंदाजीसाठी आलेला आहे.

30 Mar 2024, 19:51 वाजता

लखनऊला चौथ्या ओव्हरमध्ये के एल राहूलच्या स्वरूपात फार मोठा धक्का बसलेला आहे, राहूल हा अर्शदीपच्या बॉलिंगवर 15 धावाकरून बाद झाला. 

30 Mar 2024, 19:19 वाजता

लखनऊ सूपर जाएंट्सचा मोठा निर्णय घेतलाय. आजच्या मॅचमध्ये के एल राहूल हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे. तर टीमचे नेतृत्व आज निकोलस पूरनच्या हाती सोपवलेले आहे. 

30 Mar 2024, 19:15 वाजता

लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (C), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.

पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (C), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, जितेश शर्मा, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग