Breaking News: वादळामुळे भीमा नदीत बुडाली बोट, एकाने पोहून वाचवले प्राण तर 5 जण..

भीमा नदी पात्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. कळाशी - ते कुगाव दरम्यान नदीत बोट  बुडाली  आहे. भीषण वादळामुळे ही बोट बुडाल्याचे सांगण्यात येतंय. यामध्ये एकाने पोहोत  जीव वाचवला तर अनेकजण बुडाल्याची घटना घडली आहे.

Updated: May 21, 2024, 09:11 PM IST
Breaking News: वादळामुळे भीमा नदीत बुडाली बोट, एकाने पोहून वाचवले प्राण तर 5 जण.. title=
Storm in Bhima River

Storm in Bhima River: भीमा नदी पात्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. कळाशी - ते कुगाव दरम्यान नदीत बोट  बुडाली  आहे. भीषण वादळामुळे ही बोट बुडाल्याचे सांगण्यात येतंय. यामध्ये एकाने पोहोत  जीव वाचवला तर अनेकजण बुडाल्याची घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी होऊन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे बोट चालली होती. दरम्यान उजनी धरण पात्रात सायंकाळच्या वेळेत वादळी वाऱ्याचा फटका प्रवाशांना बसला.  त्यामुळे बोट (लांस )पलटी झाली. 

या अपघातात 5 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यातून एका जणाने पोहत आपला जीव वाचवला आहे. घटना समजतात  बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन पोहचत आहेत.