R Ashwin wife : 500 आणि 501 दरम्यान काय घडलं? आश्विनच्या पत्नीची भावूक पोस्ट, म्हणाल्या 'आयुष्यातील कठीण 48 तास...'

Prithi Narayanan emotional Instagram post : आर अश्विनला (Ravichandran Ashwin) तिसऱ्या कसोटीत अचानक मायदेशी रवाना व्हावं लागलं होतं.

सौरभ तळेकर | Updated: Feb 18, 2024, 11:58 PM IST
R Ashwin wife : 500 आणि 501 दरम्यान काय घडलं? आश्विनच्या पत्नीची भावूक पोस्ट, म्हणाल्या 'आयुष्यातील कठीण 48 तास...'  title=
Prithi Narayanan emotional Instagram post

Ravichandran Ashwin wife Prithi Narayanan : टीम इंडियाने राजकोट कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय (IND vs ENG) मिळवला. धारदार गोलंदाजी आणि आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडची हवा काढली. फिरकीपटू रविंद्र जडेजाने अचूक मारा करत विकेट्स खोलल्या. मात्र, आर अश्विनला (Ravichandran Ashwin) तिसऱ्या कसोटीत अचानक मायदेशी रवाना व्हावं लागलं होतं. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आश्विनच्या आईची (R Ashwin Mother) तब्येत बिघडल्याने त्यांना चेन्नईला परतावं लागल्याचा खुलासा केला होता. तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अश्विनला त्याच्या घरी आणि परत जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था केली होती, अशी माहिती रवी शास्त्री यांनी दिली होती. अशातच आता रविचंद्रन आश्विनची पत्नी प्रिती नारायण (Prithi Narayanan) हिने इन्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

प्रिती नारायण यांनी काय म्हटलंय?

हैदराबादपर्यंत आम्ही 500 चा पाठलाग केला, पण तसं झालं नाही. विझागमध्ये असं घडलं नाही. म्हणून मी फक्त एक टन मिठाई विकत घेतली आणि 499 मध्ये घरी सर्वांना दिली. 500 आले आणि शांतपणे गेले देखील...हे घडेपर्यंत... 500 आणि 501 च्या दरम्यान बरंच काही घडलं. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे 48 तास होते, असं आश्विनच्या पत्नीने इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पण हे छोटी मोठी कामगिरी नसून 500 वी कामगिरी आहे आणि त्याआधीचे 499 विकेट्स... किती अभूतपूर्व कामगिरी आहे, असं म्हणत प्रिती नारायणने आश्विनच्या कामगिरीचं कौतूक केलंय. आश्विन मला तुझा खूप अभिमान आहे. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, असं आश्विनच्या पत्नीने इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाहा पोस्ट

दरम्यान, आश्विनला इंग्लंडचा पहिला डाव सुरू असताना मैदान सोडावं लागलं होतं. त्यामुळे इंग्लंडच्या डावावेळी इतर गोलंदाजांना लॉग स्पेल टाकावे लागले. मात्र, दुसऱ्या इंग्लंडच्या डावावेळी आश्विन आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पुन्हा मैदानात आला. त्यामुळे त्याचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय.