खेळाडूवर भडकला आफ्रिदी; 'बेटा जब तुम पैदा हुए थे, मैंने...'

पाहा त्यावेळी नेमकं काय झालं.... 

Updated: Dec 1, 2020, 07:08 PM IST
खेळाडूवर भडकला आफ्रिदी; 'बेटा जब तुम पैदा हुए थे, मैंने...'

नवी दिल्ली : Pakistan पाकिस्तानच्या cricket क्रिकेट संघातील खेळाडू shahid afridi शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या भोवती असणाऱं चर्चा आणि वादाचं वलय हे काही क्रीडा रसिकांसाठी नवं नाही. आता पुन्हा एकदा आफ्रिदीच्याच नावाची चर्चा सुरु आहे. चर्चेस कारण ठरत आहे तो म्हणजे एक वाद. 

Add Zee News as a Preferred Source

लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League 2020) मध्ये कँडी टस्कर्स (Kandy Tuskers) आणि गॉल ग्लॅडिएटर्स (Galle Gladiators) या दोन संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या एका सामन्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये आफ्रिदी अफगाणिस्तानचा 21 वर्षीय खेळाडू नवीन उल हक याच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे. 

सदर सामन्यात मोहम्मद आमिर आणि नवीन उल हक यांच्यात बाचाबाची झाली. ज्यामुळं सामन्यानंतर आफ्रिदीनं नवीनची शाळा घेतली. सामना सुरु असताना 18 व्या षटकात अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजानं गैरशब्दांचा वापर केला. मैदानात खेळाडूंनी त्याला थांबण्याचाही प्रयत्न केला. पण, तो न थांबता आमिरशी वाद घालतच राहिला. ज्यामुळं आफ्रिदीचा पारा चढला. 

सामना संपल्यानंतर ज्यावेळी दोन्ही संघ एकमेकांसमोर आले तेव्हा, नेमकं काय झालंय.... असा प्रश्न केला. तेव्हा नवीनही संतापला. त्याचं हे रुप पाहून आफ्रिदीनं या खेळाडूला उत्तर देत 'बेटा मैंने इंटरनेशनल क्रिकेट में शतक जड़ दिया था, तुम्हारे पैदा होने से पहले’ असं म्हतम त्याला खडे बोल सुनावले. 

 

About the Author