मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी गेल्या काही दिवसांपासून बंगरुळच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठीच्या स्पेशल ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा ३ जुलैपासून सुरु होत आहे. यात ३ वनडे, ३ टी-२० आणि ५ टेस्ट मॅच खेळल्या जातील. धोनीचे बाईक आणि गाडीप्रेम काही लपलेले नाही. अलिकडेच त्याने आयपीएल दौऱ्यात आपल्या गाड्या आणि बाईकच्या कलेक्शनबद्दल सांगितले. यात एक बाईक अशी आहे की, जी पूर्ण साऊथ ईस्ट आशियात कोणाकडेच नाही. या बाईकचे नाव आहे कॉन्फेडरेट X132 हेलकॅट.
कॉन्फेडरेट X132 हेलकॅटवर झीवाचे खास फोटोशूटही झाले आहे. धोनीशिवाय हॉलिवूड कलाकार ब्रॅड पिट, टॉम क्रुज, रायन रेनॉल्ड्स आणि इंग्लंडचा फुटबॉलपटू डेविड बेकहम यांच्याजवळ ही बाईक आहे. जगात अशा फक्त १५० बाईक्स बनवण्यात आल्या आहेत.
कॉन्फेडरेट X132 हेलकॅट चे नाव एका खतरनाक लढावू विमानावरुन ठेवण्यात आले आहे. या लढावू विमानाचा वापर दुसऱ्या विश्वयुद्धात करण्यात आला होता. ही बाईक बनवण्यासाठी टाईटेनियमचा वापर करण्यात येतो. जे विमानातही वापरले जाते. हे अतिशय कठीण आणि हलके असते. या बाईकची चाकं कार्बन फायबरने बनलेली आहेत. त्यामुळे बाईकचे वजन अजून कमी होते. या बाईकचे वजन सुमारे 227 किलोग्रॅम आहे.
महेंद्र सिंग धोनीला बाईकचे प्रचंड वेड आहे. कोणतीही चांगली बाईक मिळाल्यास ती चालवण्याची संधी तो अजिबात सोडत नाही. 2016 मध्ये धोनीने झिम्बोबेच्या एका पोलिसांची बाईक मागवून चालवली होती.
धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये कावासाकी ZX14R ही बाईक देखील आहे. यात 998 सीसी आणि 4 सिलेंडर इंजिन या खासियत आहेत. धोनीने ही बाईक गेल्यावर्षी खरेदी केली होती.
त्याचबरोबर धोनीकडे नॉर्टन जुबिली 250 ही बाईक देखील आहे. महेंद्र सिंग धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये सुजुकी शोगुन आणि यमाहा आरडी 350 या बाईक्सचाही समावेश आहे. यमाहा आरडी 350 राजदूत ही धोनीची पहिली बाईक असून त्या बाईकशी धोनीची वेगळीच ओढ आहे.
महेंद्र सिंग धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये बीएसए गोल्डस्टार देखील समावेश आहे. 100 किमी प्रती तासाच्या स्पीडने ही बाईक चालते.
2009 मध्ये धोनीची लग्जरी कार ‘हमर एस-2’खूप चर्चेत होती. ही कार धोनीने १ कोटी रुपयांना खरेदी केली होती. धोनीकडे जबरदस्त कार्सचेही कलेक्शन आहे. यात Mitsubishi Outlander, टोयोटा कोरोला, स्कार्पियो (ओपन), पजॅरो SFX, ऑडी Q7 SUV, लॅंड रोवर, GMC Sierra, Ferrari 599, मारुती स्विफ्ट, मारुती SX4 यांचा समावेश आहे.