मैदानात बसल्या बसल्या या प्रेक्षकाने कमावले 1 लाख रुपये

क्रिकेट पाहता पाहता कमवले 1 लाख रुपये

शैलेश मुसळे | Updated: Apr 18, 2018, 12:11 PM IST
मैदानात बसल्या बसल्या या प्रेक्षकाने कमावले 1 लाख रुपये

मुंबई : मंगळवारी झालेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यामध्ये मुंबईने हा सामना 46 रनने जिंकला. या सामन्यामध्ये मैदानात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या व्यक्तीने 1 लाख रुपये कमवले. या सामन्यामध्ये रोहित शर्माने 94 रन केले तर विराटने 92 रन केले.

सामन्यात 19.3 ओव्हरमध्ये जेव्हा अँडरसनच्या फुलटॉस बॉलवर रोहित शर्माने डीप एक्स्ट्रा कवरवर शानदार सिक्स मारला तेव्हा तो प्रेक्षकांमध्ये गेला. पण एका प्रेक्षकाने तो बॉल कॅच केला. यामुळे त्याने टाटा नेक्सॉन फॅन कॅचचा अॅवॉर्ड जिंकला. सामन्यामध्ये एका हाताने कॅच पकडणाऱ्य़ा प्रेक्षकाला हा अॅवॉर्ड दिला जातो. ज्यामध्ये 1 लाख रुपये बक्षीस दिलं जातं.

अॅवॉर्ड मिळवण्यासाठी एक अट असते की ती कॅच एका हातानेच पकडलेली असावी. दोन हातांनी कॅच पकडली तर त्यासाठी बक्षीस नाही दिलं जात. हा सिक्स मारताच रोहितने 50 बॉलमध्ये 90 रन पूर्ण केले. त्यानंतर त्याने फोर मारला. पण 94 रनवर रोहित आऊट झाला.