टीम इंडियात जाण्याचं स्वप्न राहिलं अधुरं, पण झाला सुपरस्टार...

आपल्याला जे करायचं असतं ते काही कारणांमुळे स्वप्न अपूर्ण राहातं अशावेळी आपण दुसऱ्या स्वप्नाच्या मागे लागतो किंवा आहे त्या परिस्थितीत आणखी उत्तम करण्याचा प्रयत्न करतो.

Updated: May 12, 2021, 01:36 PM IST
टीम इंडियात जाण्याचं स्वप्न राहिलं अधुरं, पण झाला सुपरस्टार... title=

मुंबई: आजच्या घडीला सुपरस्टार अणि राजकारणात सक्रिय म्हणून घराघरात ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याने एकेकाळी टीम इंडियात आपली निवड व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. क्रिकेट हा त्याचा आवडता खेळ होता. अगदी राज्यस्तरापर्यंत क्रिकेटच्या अनेक स्पर्धाही खेळल्या होत्या. मात्र पुढे टीम इंडियात जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि अभिनय क्षेत्रात मोठं नाव मिळालं. 

भोजपुरी सिनेमाचा सुपरस्टार मनोज तिवारी यांना क्रिकेटचं खूप वेड आहे. आपल्या अदा गाणं आणि अभिनयाने आज ते घराघरात पोहोचले आहेत. त्यांची वेगळी ओळख आहे. फक्त भोजपुरीच नाहीत तर आज देशात त्यांना लोक ओळखतात. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान क्रिकेटबाबत सांगितलं होतं. 

मनोज तिवार म्हणाले की, 'मला खरं तर क्रिकेटर व्हायचं होतं. टीम इंडियातून खेळण्याचं माझं स्वप्न होतं. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं प्रभुत्वदेखील त्यांनी केलं आहे.' तर कपिल शर्मा शोमध्ये देखील त्यांनी आपण राज्य स्तरीय क्रिकेट सामने खेळल्याचं कबूल केलं होतं. 

काही कारणांमुळे मनोज तिवारी यांना टीम इंडियामध्ये जाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे त्यांनी खूप दु:ख झालं. क्रिकेटमध्ये अपयश आल्यामुळे त्यांनी पुढे गायन, लोकगीतांचा आधार घेतला. गायन आणि अभिनयात त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आणि आजच्या घडीला तर घराघरात त्यांचं नाव आहे. 

भोजपुरी चित्रपटांत वेगळी ओळख निर्माण झाल्यानंतर मनोज यांनी राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. 2014 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढविली पण तिसर्‍या क्रमांकावर राहिले. 2014च्या लोकसभेपूर्वी त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला. ते दिल्ली भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत आणि सध्या ते दिल्लीच्या उत्तर-पूर्व दिल्लीचे खासदार आहेत.