मनु भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार? वडिलांनी अखेर सौडलं मौन, म्हणाले, 'ती फार...'

ऑलिम्पिकमध्ये (Olympic) दोन कांस्यपदकांची (Bronze Medal) कमाई करणारी नेमबाज मनु भाकर (Manu Bhaker) आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यादरम्यान अनेकजण दोघांमध्ये रोमँटिक अँगल असल्याचा दावा करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 13, 2024, 12:34 PM IST
मनु भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार? वडिलांनी अखेर सौडलं मौन, म्हणाले, 'ती फार...' title=

ऑलिम्पिकमध्ये (Olympic) दोन कांस्यपदकांची (Bronze Medal) कमाई करणारी नेमबाज मनु भाकर (Manu Bhaker) आणि तिची आई यांनी गोल्डन बॉय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगतेनंतर पार पडलेल्य़ा कार्यक्रमाला नीरज चोप्राने हजेरी लावली. या कार्यक्रमात मनु भाकर आणि तिच्या आईदेखील उपस्थित होती. ज्याप्रकारे तिघे चर्चा करत होते, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. अनेकांनी तर दोघे एकमेकांशी लग्न करतील असे दावे केले. दरम्यान या सर्व चर्चांवर मनु भाकरच्या वडिलांनी भाष्य केलं आहे. आपली मुलगी अद्याप लग्न करण्यासाठी फारच लहान आहे असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

मनु भाकरेच्या वडिलांनी आपली मुलगी आणि नीरज चोप्रा लग्न करणार असल्याच्या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. ती सध्या लग्नाचा विचारही करत नसल्याचं ते म्हणाले आहेत. "मनु भाकर अद्याप फारच तरुण आहे. तिचं अजूनही लग्नाचं वय झालेलं नाही. तिच्या लग्नाचा कोणताही विचार नाही," असं मनु भाकरचे वडील राम किशन यांनी दैनिक भास्करशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये मनु भाकरचे आई नीरज चोप्राशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. राम किशन यांनी मनुची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते. त्यामुळे दोघांमध्ये चांगलं नातं आहे असं सांगितलं. "मनुची आई नीरजला आपल्या मुलाप्रमाणे मानते," असं ते म्हणाले. यादरम्यान त्यांनी नीरज चोप्रा आणि मनु भाकर यांच्यात काहीही रोमँटिक अँगल असल्याचे दावे फेटाळले. 

नीरजच्या काकांनीही त्याच्या लग्नाच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "ज्याप्रकारे नीरजने पदक आणल्यानंतर संपूर्ण देशाला समजलं होतं, त्याच प्रकारे जेव्हा तो लग्न करेल तेव्हा सर्वांना समजेल".

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु आणि नीरज दोन सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी आहेत. दोघांनाही आपल्या खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्यात कमी पडलो असं वाटत असलं तरी त्यांनी ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंच केली आहे. मनुने दोन वेगवेगळ्या नेमबाजी स्पर्धांमध्ये दोन कांस्यपदकं जिंकली, तर नीरजने पॅरिसमध्ये रौप्यपदकाची कमाई केली.