IND vs AUS : Virat Kohli चा सल्ला घेणं लाबुशेनला पडलं महागात; पुढच्याच बॉलला गमावली विकेट

लंचनंतर दुसऱ्या सेशनची पहिली ओव्हर फेकण्यासाठी रविंद्र जडेजा आला. यावेळी जडेजाने लाबुशेनला विकेटच्या मागे श्रीकार भरतद्वारे स्टंप आऊट केलं.

Updated: Feb 9, 2023, 04:40 PM IST
IND vs AUS : Virat Kohli चा सल्ला घेणं लाबुशेनला पडलं महागात; पुढच्याच बॉलला गमावली विकेट title=

IND vs AUS, 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) सिरीजला सुरुवात झाली आहे. या सिरीजचा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ स्टेडियममध्ये खेळला जात असून भारतीय गोलंदाजांनी कांगारूंची दाणादाण उडवली. अवघ्या 177 रन्सवर ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला. कांगारूंचे दोन्ही ओपनर फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर मार्नस लाबुशेनच्या (Marnus Labuschagne) रूपाने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्काही बसला. दरम्यान त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Virat Kohli शी बोलणं लाबुशेनला पडलं महागात

लंचनंतर दुसऱ्या सेशनची पहिली ओव्हर फेकण्यासाठी रविंद्र जडेजा आला. यावेळी जडेजाने लाबुशेनला विकेटच्या मागे श्रीकार भरतद्वारे स्टंप आऊट केलं. यावेळी अवघ्या 1 रन्सने त्याचं अर्धशतक चुकलं. लाबुशेनच्या 49 रन्सची खेळीने ऑस्ट्रेलियाला मात्र सांभाळलं. मात्र याचदरम्यान विकेट पडण्याअगोदर विराट कोहलीचा लाबुशेनशी बोलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडीओ पाहून, चाहत्यांनी असा अंदाज लावला आहे की, विराट कोहलीने बोलण्यात

गुंतवल्यामुळे लाबुशेनची विकेट गेली. कारण कोहलीशी बोलल्यानंतर लगेच रविंद्र जडेजाच्या पुढच्या बॉलवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात आऊट झाला. 

 

लाबुशेनची उत्तम खेळी

ऑस्ट्रेलियाचे ओपनर डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा हे दोघंही 1-1 रनवर आऊट झाले आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव लाबुशेन आणि स्टीव स्मिथने सांभाळला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 82 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र कोहलीशी बोलल्यानंतर त्याने त्याची विकेट गमावली. लाबुशनने 123 बॉल्समध्ये 49 रन्सची खेळी केली. ज्यामध्ये 8 फोर्सचा समावेश आहे.

भारतीय गोलंदाजांची कमाल

कॅप्टन पॅट कमिन्सचा (Pat Cummins) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय फेल ठरला. सुरूवातीला रोहितने मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपवला. त्याचं फळ टीम इंडियाला मिळालं. 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू टीमला पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या होत्या.  त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात टिकता आलं नाही.

शमी सिराजच्या जोडीनंतर रोहितने (Rohit Sharma) पीचचा अंदाज घेऊन पाच महिन्यांनंतर कमबॅक करणाऱ्या रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) हातात बॉल सोपवला. जडेजाने Labuschagne चा विकेट काढला आणि भारताला आणखी एक विकेट काढून दिली. त्यानंतर अक्षर पटेल (Axar Patel) आणि आश्विनच्या तिघाडीचा वापर करत भारताने उर्वरित फलंदाजांना तंबुत परतवलं. जडेजाने 22 ओव्हरमध्ये 47 धावा दिल्या आणि 5 विकेट नावावर केले. तर आश्विनने 15 ओव्हरमध्ये 42 धावा देत 3 गडी बाद केलेत.