मुंबई: भारत सध्या कोरोना या महासंकटातून खूप वाईट स्थितीतून जात आहे. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक संकटांना तोंड देत आहे. आशा परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन भारताच्या सध्या स्थितीवर भावुक झाला आहे. त्याने विदेशी मीडियाला खडे बोल सुनावले आहेत.
मॅथ्यू हेडन यांनी भावुक होत ब्लॉक लिहिला आहे तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर करत त्याचं कौतुक देखील केलं आहे. हेडन म्हणतो की, भारत साथीच्या दुसर्या लाटेचा सामना करत आहे. अशी परिस्थिती या पूर्वी कधीच पाहिली नव्हती. जगातील मीडिया या 140 कोटी देशावर टीका कोणतीही कसर सोडत नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत अशी योजना पोहोचवणं हे एक मोठे आव्हान आहे हे माहीत असूनही ते नियोजन पद्धतीनं कसं करता येईल यासाठी प्रशासन कायम प्रयत्न करत आहे.
Extracts from a heartfelt blog on India by @HaydosTweets A cricketer whose heart is even bigger than his towering physical stature. Thank you for the empathy and your affection... pic.twitter.com/h671mKYJkG
— anand mahindra (@anandmahindra) May 14, 2021
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यूनं विदेशी मीडियाला सुनावलं आहे. 'अशा परिस्थितीमध्ये भारताचा सन्मान करायला हवा. तुम्ही जी भारताची निंदा आणि टीका करत आहात त्याने मला रडू येत आहे.'
'भारतात मी जिथे जिथेही गेलो तिथे लोकांनी मला खूप प्रेम दिले. यासाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहिन. मी मोठ्या अभिमानाने आणि ठामपणे असे म्हणू शकतो की गेल्या काही वर्षात मी भारत अगदी जवळून पाहतो आहे. त्यामुळे मला भारताबद्दल वाईट लिहिणाऱ्यांमुळे रडू येत आहे.'
या कठीण काळात जगभरातून मदतीसाठी हात पुढे येत आहेत. अनेक खेळाडू-संस्थांनी मदत केली आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही हेडनचा ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी हेडनचे ट्वीटरवर आभार मानले आहेत.