भारताकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी

वनडे सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाची नवी खेळी

Updated: Jan 2, 2019, 12:49 PM IST
भारताकडून पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मोठी खेळी title=

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या ४ सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. ज्यामध्ये ३ सामन्यांमध्ये भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. ३ जानेवारी चौथा आणि शेवटचा सामना रंगणार आहे. सिरीज जिंकण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. गेल्या एक वर्षापासून ऑस्ट्रेलियाची टीम काही खास कामगिरी करु शकलेली नाही. या वर्षात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डेविड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ टीममधून बाहेर आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात १२ जानेवारीपासून वनडे सिरीज सुरु होणार आहे. यासाठी दोन्ही संघांनी टीमची घोषणा केली आहे.
 
ऑस्ट्रेलियाने टी-२० चा बदला घेण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल आणि एरॉन फिंचला टीममध्ये घेतलं आहे. हे दोघेही खेळाडू मॅचची बाजू बदलण्यात माहिर आहेत. भारताला पराभूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियासाठी या दोन्ही खेळाडूंकडून त्यांना मोठी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलिया टीमचे २ दिग्गज खेळाडू बॉल ट्रेपिंग प्रकरणात टीममधून बाहेर आहेत. त्यांच्यावर १ वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. २६ मार्चपर्यंत ही बंदी असणार आहे.