टीम इंडियाने घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

 भारतीय क्रिकेट टीमला केलं होतं आमंत्रित

Updated: Jan 2, 2019, 11:29 AM IST
टीम इंडियाने घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट title=

मुंबई : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट टीमला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं होतं. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री हे देखील उपस्थित होते. भारतीय टीमने यावेळी पंतप्रधान मॉरिसन यांची भेट घेतली.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने ट्विटरवर याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये विराट कोहली आणि टीम पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासोबत दिसत आहे. एका दुसऱ्या फोटोमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या टीमसोबत उभी असलेली दिसत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ जानेवारीला चौथा आणि शेवटचा सामना रंगणार आहे. सिडनीमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय टीम सीरीजमध्ये २-१ ने पुढे आहे.

सिडनी टेस्टसाठी भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.