मुंबई : मुंबई इंडियन्सची (MI) चा खेळाडू टीम डेव्हिडने त्याची इच्छा उघड केली आहे. तो वेस्ट इंडिजचा बिग हिटर खेळाडू किरॉन पोलार्ड सोबत खेळण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. त्याने कर्णधार रोहित शर्माचेही कौतुक केले आणि या सर्वोत्तम खेळाडूंकडून शिकण्याची इच्छा व्यक्त केलीये.
मागच्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळलेल्या डेव्हिडसाठी MI ने तब्बल 8.25 कोटी रुपये खर्च केले. जरी त्याला आयपीएलमध्ये जास्त सामने खेळायला मिळाले नसले तरी जगभरातील टी-20 लीगमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याला संधी मिळाली आहे. डेव्हिड MI सोबत नवा प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे.
डेव्हिडने mumbaiindians.com सोबत बोलताना म्हटलं की, 'त्याच्यासोबत फलंदाजी करणे ही एक रोमांचक कल्पना आहे. पॉली ही अशी व्यक्ती आहे ज्याचे मी त्याच्या पॉवर हिटिंगसाठी कौतुक केले आहे आणि मी स्वतः ते कसे करू शकतो हे पाहण्यासाठी त्याच्या काही खेळी पाहिल्या आहेत. जर आम्ही मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये जाऊ शकलो तर आम्ही काही खेळ काढून घेऊ शकतो.'
''रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा तो इतका सहज दिसतो, हे खूप प्रशंसनीय आहे. क्लास खेळाडूंसोबत वेळ घालवता येणे आणि त्यांचा डोक्यात काय सुरु असतं हे जवळून पाहायला मिळणं हा एक मोठा बोनस आहे.'
आयपीएल 2022 सीझन 27 मार्च रोजी सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि दोन नवीन संघ जोडल्यामुळे 28 मे रोजी समाप्त होऊ शकतो.