मुंबई : मॅडम तुसाद म्युझियममध्ये उडान सिख यांना वेगळं स्थान मिळालं आहे. इथे जगभरातील इतर दिग्गद व्यक्तींसोबत मिल्खा सिंह यांचा मेणाचा पुतळा बनवला आहे. जेव्हा मिल्खा यांनी आपला मेणाचा पुताळा पाहिला तेव्हा ते थक्कच झाले. पुतळ्याला बघून मिल्खा सिंह यांनी सांगितलं होतं की, 'माझ्या जाण्यानंतर माझा पुतळाच तुम्हाला माझी आठवण करून देईल.'
पुतळा बनवण्याअगोदर कंपनीच्या प्रतिनिधींनी मिल्खा सिंह यांचे हजारो फोटो काढले होते. मिल्हा सिंह तरूणपणात जसे धावत होते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी टिपण्यात आल्या होत्या. कपड्यांच्या मापासाठी खास टेलर देखील बोलावले होते. हा पुतळा तयार झाल्यावर फक्त मिल्खा सिंहच नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब हैराण झाले होते.
जे शूज घालून 1960 साली मिल्खा सिंह यांनी जे ऑल्मपिकमध्ये धावण्यासाठी जे शूज घातले होते. ते शूज दृष्टीहीन मुलांच्या मदतीसाठी लिलाव केले होते. मिल्खा सिंह हे या शूजशी खूप जोडले गेले होते. यामुळे हे शूज त्यांनी कपाटात अतिशय जपून ठेवले होते.
मिल्खा सिंह यांना एकदा अभिनेता राहुल बोस चंदीगड येथे भेटायला गेले. बोलता बोलता त्यांनी मिल्खा सिंह यांना आपल्या शूजचा लिलाव करायला सांगितलं. सुरूवातीला ते शांत झाले. पण या शूजचा लिलाव करून जे पैसे मिळणार होते ते दृष्टीहीन मुलांसाठी होते.
10 लाख रुपयांनी या शूजची बोली लागली होती. या लिलावात अनेक देश, विदेशातील लोकं सहभाागी झाले होते. हे शूज निर्माता आणि दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी 24 लाखांना खरेदी केले होते. यांनीच पुढे 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा तयार केला.