धक्कादायक! दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीनं  साथ सोडली, कोरोना विरुद्धची झुंज अपय़शी

Updated: Jun 14, 2021, 07:03 AM IST
धक्कादायक! दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कलाकार, खेळाडूंनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी देखील आपल्या सर्वात जवळची व्यक्ती कोरोनामुळे गमवली आहे.

मिल्खा सिंग यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पत्नीनं त्यांच्या साथ सोडली असून कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आहे. मिल्खा सिंग यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मल कौर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 5 जूनला हेल्थ अपडेटनुसार मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचं तर त्यांच्या पत्नीची प्रकृती बिघडत असल्याचा रिपोर्ट आला होता. तीन आठवड्यांपूर्वी या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. निर्मल कौर यांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला. 

मिल्खा सिंग यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना चंदीगढमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची पत्नी देखील तिथेच उपचार घेत होती. मिल्खा सिंग यांची ऑक्सिजनची पातळी देखील कमी आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिरावली. पत्नीच्या जाण्याने मिल्खा सिंग यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.