सचिन आणि सेहवागला आऊट करणारा हा बॉलर पोट भरण्यासाठी चालवतो टॅक्सी

क्रिकेट खेळाडू बर्‍याचदा कोट्यवधी रुपयांचे मालक असतात. जर हे खेळाडू त्यांच्या देशासाठीदेखील खेळू शकले नाहीत, तरी ते बर्‍याच मोठ्या क्रिकेट लीगमध्ये जगभर दौरा करतात. 

Updated: Jun 13, 2021, 08:29 PM IST
सचिन आणि सेहवागला आऊट करणारा हा बॉलर पोट भरण्यासाठी चालवतो टॅक्सी title=

सिडनी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडुंना कधी पैशाची कमी भासत नाही. कारण त्यांच्याकडे जाहिरातीतून , क्रिकेट लीगमधून आणि त्यांच्या चांगल्या खेळामुळे त्यांना चांगली रक्कम मिळते त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळीडूकडे पोट भरण्यासाठी पैसे नसतील ही बात नवलच वाटण्यासारखी आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू कित्येक कोटी रुपयांमध्ये खेळतात, ते लग्झरी आयुष्य जगतात. त्यांच्या आयुष्यात कधीच पैशांची कमी येत नाही. पंरतु पाकिस्तानमधल्या एका माजी खेळाडूची परिस्थिती मात्र खूप वेगळी आहे.

पाकिस्तानी क्रिकेटरची वाईट अवस्था

1997 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानचा ऑफ स्पिनर अरशद खान पोट भरण्यासाठी सध्या टॅक्सी चालवत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात तो आपले पोट भरण्यासाठी उबर कॅब चालवतो. एकेकाळच्या स्टार खेळाडूने पोट भरण्यासाठी टॅक्सी चालविणे ही खूप मोठी गोष्ट आहे.

अरशद खानची कामगिरी नेहमीच चांगली राहिले आहे. त्याने इंडियन टीममधील स्टार खेळाडू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागचा बळी घेतला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत 9 कसोटी आणि 58 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 32 कसोटी आणि 56 एकदिवसीय विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्या करिअरचा शेवटचा सामनाही भारत विरुद्ध खेळला आहे. त्याने भारतातील दिग्गज खेळाडूंनाही आउट केले आहे. तरी अशा मोठ्या खेळाडूची इतकी वाईट अवस्था झाली आहे.

क्रिकेटपटू कोट्यवधी रुपये कमवतात

क्रिकेट खेळाडू बर्‍याचदा कोट्यवधी रुपयांचे मालक असतात. जर हे खेळाडू त्यांच्या देशासाठीदेखील खेळू शकले नाहीत, तरी ते बर्‍याच मोठ्या क्रिकेट लीगमध्ये जगभर दौरा करतात. जिथे त्यांना खेळण्याची  संधी मिळते. या लीगमध्ये आयपीएल, बीबीएल, पीएसएल अशा लिगचा ही समावेश आहे.