ICC Mens T20 World Cup 2022 Schedule : आशिया कपचा (Asia Cup 202) प्रबळ दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला सुपर 4 मधून टीम इंडिया बाहेर पडली होती. मात्र आता भारतीय संघाचं लक्ष्य हे टी-20 वर्ल्डकप असणार आहे. टी-20 वर्ल्डकपचं (T20 World Cup 2022) टाईमटेबल समोर आलं असून भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संघासोबत होणार आहे. 23 ऑक्टोंबरला हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या थराराला 16 ऑक्टोंबरपासून सुरूवात होणार आहे. (ICC Mens T20 World Cup 2022 Schedule)
टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये एकूण 16 संघ असणार असून ही स्पर्धा एकूण तीन स्टेजमध्ये खेळवण्यात येणार आहे. राऊंड1, सुपर-12 आणि प्ले-ऑफमध्ये अशा स्टेज असणार आहेत. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 4-4 संघांचे दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये टॉप-2 राहणारा संघ सुपर-12 पर्यंत पोहचणार. त्यानंतर सुपर-12 स्टेजमध्ये 6-6 संघांचे दोन ग्रुप असणार आहेत. यामध्ये टॉप दोनमधील दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.
टी-20 वर्ल्डकप साठी एकूण 45 सामने होणार असून यामधील क्वालिफाईंग राऊंडचे सामने होबार्ट आणि जिलॉंगमध्ये खेळवले जाणार आहेत. तर सिडनी (Sydney), मेलबर्न (Melbourne), पर्थ (Perth), एडिलेड (Adelaide) आणि ब्रिस्बेन (Brisbane) या ठिकाणी सुपर-12 सामने होणार आहेत. डिलेड ओवल (Delayed Oval) आणि सिडनी (Sydney) क्रिकेटच्या मैदानात सेमीफायनलचे सामने होणार आहेत.
राउंड-1
ग्रुप A: श्रीलंका, यूएई, नेदरलँड्स, नामीबिया
ग्रुप B: आयरलँड, स्कॉटलंड, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज
सुपर-12
ग्रुप 1: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलंड, अफगानिस्तान, ग्रुप-A विजेता, ग्रुप-B उपविजेता
ग्रुप 2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश, ग्रुप-A उपविजेता, ग्रुप-B विजेता
T20 विश्वचषकातील भारताचे सामने-
भारत विरुद्ध पाकिस्तान : 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
भारत विरुद्ध ग्रुप A उपविजेता : 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
भारत विरुद्ध बांगलादेश : 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अॅडलेड)
भारत विरुद्ध ग्रुप B विजेता : 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)