Dhoni घेणार उद्या निवृत्ती? धोनीच्या 'त्या' पोस्टनंतर चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

महेंद्रसिंग धोनी उद्या मोठी घोषणा करणार

Updated: Sep 24, 2022, 07:40 PM IST
Dhoni घेणार उद्या निवृत्ती? धोनीच्या 'त्या' पोस्टनंतर चाहत्यांचं टेन्शन वाढलं! title=

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी हे नाव कोणाला माहिती नसेल असं होणारच नाही. गल्लोगल्लीतील पोरं देखील धोनीचे फॅन्स आहेत. भारताचा विश्वविजेता बनवण्यात धोनीचा मोठा वाटा होता. 'मैं पल दो पल का शायर हूँ' म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती (MS Dhoni retirement) घेतली असली तरी धोनी आयपीएलचे  सामने खेळतो. मात्र, आता धोनी आयपीएलमधून (IPL 2023) देखील निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. (MS Dhoni is all set to announce exciting news on a Facebook live)

सोशल मीडियावर (Social Media) सध्या चर्चा होत असतानाच आता धोनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे सर्वांनाच टेन्शनमध्ये टाकलंय. उद्या लाईव्ह (MS Dhoni Live) येऊन मोठी घोषणा करणार असल्याचं धोनीने सांगितलं आहे. त्याचा फोटो देखील धोनीने शेअर केला आहे.

काय म्हणाला Dhoni?

"मी तुमच्यासोबत एक बातमी शेअर करणार आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन मी ही माहिती देईन. मला आशा आहे की तुम्ही सर्व तिथे असाल.", अशी पोस्ट धोनीने त्याच्या ऑफिशयल अकाऊंटवरून शेअर केली आहे.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मागच्या आयपीएलवेळी धोनीने निवृत्ती घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, धोनीला चेन्नईच्या मैदानावर निवृत्ती घेण्याची इच्छा आहे. तसं त्याने बोलून देखील दाखवलं होतं.

दरम्यान, उद्या धोनी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय. असं झालं तर, धोनी पुन्हा मैदानावर दिसणार नाही, याची खंत चाहत्यांच्या मनात कायम राहिल.