आफ्रिकेत 'मिताली राज' : पहिली टी २० महिला संघाने ७ विकेट्सने जिंकली

भारताकडे आता १-० अशी आघाडी आहे. १६५ रन्सचे लक्ष्य मिताली (नाबाद ५४ रन्स) च्या जोरावर १८.५ ओव्हरमध्ये पूर्ण केले. 

Updated: Feb 13, 2018, 11:41 PM IST
 आफ्रिकेत 'मिताली राज' : पहिली टी २० महिला संघाने ७ विकेट्सने जिंकली  title=

पोटचेफस्ट्रम : भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने हरविले. भारताकडे आता १-० अशी आघाडी आहे. १६५ रन्सचे लक्ष्य मिताली (नाबाद ५४ रन्स) च्या जोरावर १८.५ ओव्हरमध्ये पूर्ण केले.

मिताली 'राज'

 मितालीने ४८ बॉलमध्ये ६ चौके आणि १ सिक्स मारला. स्मृति मंधाना (२८ रन्स) ने पहिल्या विकेटसाठी तर जेमिमा रोड्रिगेज (३७ रन्स) सोबत ६९ रन्सची भागिदारी केली. 

भागिदारी 

यानंतर मितालीने वेदा कृष्णमुर्ती (नाबाद ३७) सोबत चौथ्या विकेटसाठी ५.२ ओव्हरमधअये ५२ रन्सची भागिदारी केली आणि लक्ष्य पूर्ण केले. वेदाने २२ बॉल्समध्ये ३ सिक्स आणि ३ फोर मारले.