मुंबई : आयपीएलमधील 22 वा सामना चेन्नई विरुद्ध बंगळुरू झाला. या सामन्यात बंगळुरू टीमला पराभवाचा सामना करावा लागला. तर चेन्नई टीमने आपला पहिला विजय नोंदवला. आतापर्यंत 5 सामन्यांपैकी 4 सामने चेन्नई टीम पराभूत झाली होती. आता पहिलाच सामना जिंकण्यात यश आलं आहे.
चेन्नईच्या बॅटिंगदरम्यान मोईन अली क्रीझवर खेळत होता. मोईनला जास्तवेळ टिकू द्यायचं नाही असं जणू RCB च्या खेळाडूंनी ठरवलंच होतं. त्यात पदार्पणातच सुयश प्रभूदेसाईच्या कामगिरीनं सर्वांची मन जिंकली.
मोईन अलीनं मारलेल्या बॉलला डाइव्ह मारून सुयश प्रभुदेसाईने पकडलं. सुयशने तो बॉल चित्त्याच्या वेगानं पकडला आणि दिनेश कार्तिककडे थ्रो केला. दिनेशने मोईनला रनआऊट केलं. या रनआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Rishobpuant (@rishobpuant) April 12, 2022
CSK टीमची सुरुवात अत्यंत खराब झाली. ऋतुराज गायकवाड 17 धावा करून माघारी परतला. मोईन अली 8 बॉलवर 3 धावा करून आऊट झाला. रॉबिनने बऱ्यापैकी डाव सावरला. त्याने अर्धशतक झळकवत 88 धावांची खेळी केली. शिवम दुबेनं 53 धावा केल्या.