मोहम्मद कैफ ट्विटरवर पुन्हा झाला ट्रोल

नुकताच ख्रिसमस पार पडला आहे.

Updated: Dec 26, 2017, 08:19 PM IST
मोहम्मद कैफ ट्विटरवर पुन्हा झाला ट्रोल   title=

मुंबई : नुकताच ख्रिसमस पार पडला आहे.

लवकरच नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सारे तयार होणार आहेत. भारतामध्ये विविधतेतही एकता आहे. त्यामुळे कोणताच सण हा केवळ एका धर्मासाठी, जातीपुरता मर्यादीत राहत नाही. 

आपापल्या परीने जाती, धर्माच्या सार्‍या भिंती पार करून सण साजरा केला जातो. पण क्रिकेटर मोहम्मद कैफ पुन्हा कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. 

का झाला मोहम्मद कैफ ट्रोल ?   

मोहम्मफ कैफ मुस्लीम धर्मीय असूनही ख्रिसमस साजरा करत असल्याचे पाहून काही कट्टरवाद्यांनी त्याबबात आक्षेप घेतला आहे. 

परिवारासोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर मोहम्मद कैफने फोटो शेअर केला. त्यानंतर काहींनी कैफला समर्थन दिले तर काहींनी त्याच्यावर टीका केली.  

कैफ या पूर्वीही झाला होता ट्रोल  

मोहम्मद कैफ यापूर्वीदेखील सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. काही दिवसांपूर्वी बुद्धिबळ खेळतानाचे  फोटो त्यांनी शेअर केले होते. त्यानंतर कैफ ट्रोल झाला होता. तसेच ' रक्षाबंधना'च्या दिवशीही कैफ ट्रोल झाला होता. 

'प्रत्येकाने इतर मुलींशी आपल्या बहिणींप्रमाणे वागायला हवे अशा आशयाचे ट्विट केले होते.