शमीच्या पत्नीला सोशल मीडियावर धमक्या ; मागितले पोलिस संरक्षण...

भारतीय संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वाद यांच्या चक्रव्हुवात अडकला आहे. 

Updated: Mar 14, 2018, 10:40 AM IST
शमीच्या पत्नीला सोशल मीडियावर धमक्या ; मागितले पोलिस संरक्षण... title=

कोलकत्ता : भारतीय संघाचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून आरोप, वाद यांच्या चक्रव्हुवात अडकला आहे. त्याच्या पत्नीने हसीन जहॉने त्याच्यावर अनैतिक संबंधांपासून ते मॅच फिक्सिंगपर्यंतचे गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणत्येय हसीन ?

या वादात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच हसीनने आता पोलीस सुरक्षा मागतील आहे. ती शमीबद्दल खुलेपणाने बोलायला लागल्यापासून तिला सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या आहेत, असे तिचे म्हणणे आहे. यासाठी तिने बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जींकडेही मदतीची याचना केली आहे. 

वकीलांचे समर्थन

हसीन जहॉंचे वकील जाकीर हुसेन यांनी सांगितले की, सोशल मीडियावर मिळणाऱ्या धमक्यांमुळे हसीनला बाहेर जाण्यास असुरक्षित वाटत आहे. ज्या अकाऊंटवरुन धमक्या येत आहेत ते फेक अकाऊंटही असू शकते किंवा नसूही शकते. 
यासाठी हसीन कोलकत्ताचे पोलिस मुख्यालय, लालबाजारात पोलिस सुरक्षेची मागणी करण्यासाठी गेली होती.

शमीचे वागणे भीतीपोटी

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, या प्रकरणी ती मुख्यमंत्री ममता बनर्जींकडून मदतीची अपेक्षा करत आहे. महिला मुख्यमंत्र्याबद्दल हसीनच्या मनात खूप सन्मान आहे. त्यामुळे एकदा मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना या प्रकरणाबद्दल सांगितल्यास हसीनला समाधान लाभेल.
सतत होणाऱ्या आरोपांनंतरही शमी हा कौटुंबिक वाद शांतपणे हाताळत आहे. मात्र हसीन म्हणते की हे सगळे शमी भितीपोटी करत आहे.