मुंबई : मोहम्मद शमीने 7 सामन्यात 24 विकेट घेऊन वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) नवा इतिहास रचला. त्याचबरोबर शमीने (Mohammed Shami) यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक रेकॉर्ड देखील मोडीस काढले आहेत. शमीला यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिल्या 4 सामन्यात संधी मिळाली नव्हती. या वर्ल्डकप दरम्यान सगळ्यात जास्त कोणाची चर्चा झाली असेल तर ती मोहम्मद शमीची. शमीच्या कामगिरीमुळे अनेकांच्या हृद्ययात त्याने स्थान मिळवलं. आता मोहम्मद शमीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो भावूक होताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओ मध्ये तो तिच्या दुखापतीबद्दल सांगताना दिसत आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे की, शमी कोणत्या स्थितीतून गेला आहे. २०१५ साली शमीला दुखापत झाली होती. आणि यावेळी त्याचं खेळणंही अशक्य झालं होतं. डॉक्टरांनी क्रिकेट विसरण्याचा सल्लाही त्याला दिला होता. मात्र त्याची मेहनत आणि परिश्रम कायमच यामुळे त्याने या सगळ्यावर मात केली आहे. याबद्दल बोलता शमी म्हणाला,
''डॉक्टरने आणि माही भाईने एकच एकच प्रश्न विचाला होता. दोनच अटी आहेत. एक तर जाऊन ऑपरेशन कर किवा वर्ल्डकप खेळल्यानंतर ऑपरेशन कर. मी या दोघात फरक काय आहे असं विचारलं. ते म्हणाले आता सुज आहे. आराम केल्यानंतर ती कदाचित कमी होईल. पण 80 टक्के ऑपरेशन करावंच लागेल. मी दुसऱ्यात काय होईल असं विचारलं. ते म्हणाले जर तू वर्ल्डकप खेळलास तर वेदना प्रमाणाबाहेर होतील पण वर्ल्डकप खेळू शकतोस आणि दुसरी गोष्ट संघाला आता गरज आहे.''
पुढे शमी म्हणाला, ''मला फक्त अर्ध्यात सोडावं लागणार नाही याची खात्री द्या. जर तुटलं तरी मी मध्येच खेळ नाही सोडू शकत. सामना संपल्यानंतर बघू. अर्धात नाही सोडणार.वेदनांची गॅरेंटी माझी मग कितीही वेदना होऊ द्यात त्या मी झेलेन. त्यांना मला तशी खात्री दिली. प्रत्येक सामन्यानंतर संघ हॉटेलमध्ये जायचा आणि मी हॉस्पिटलला जायचो. तिथे मला इंजेक्शन देत असत. इंजेक्शन द्यायचे गुडघ्यात एका बाजुने द्यायचे मग दुसऱ्या बाजून द्यायचे. नंतर स्टेरॉईड्स टाकायचे. तर 50 ml पेक्षा जास्त फ्लुईड निघायचं प्रत्येकवेळी.''
सध्या मोहम्मद शमीचा हा व्हिडीओ अनेकांना बळ देणारा आहे. त्याचा हा व्हिडीओ dailydosecricket या इन्स्टाग्राम पेजवरुन टाकण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.