IND vs WI: मोहम्मद सिराजने टाकला 'ड्रीम बॉल' अन् डिसिल्वाच्या दांड्या गुल; पाहा Video

Mohammed Siraj viral video: जोशुआ दा सिल्वा फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज सामना जिंकू देणार नाही, असं चित्र असताना मोहम्मद सिराजने कमाल केली. सिराजच्या घातक गोलंदाजीने सामन्याचं पारडं फिरलं. 

Updated: Jul 23, 2023, 07:08 PM IST
IND vs WI: मोहम्मद सिराजने टाकला 'ड्रीम बॉल' अन् डिसिल्वाच्या दांड्या गुल; पाहा Video title=
Mohammed Siraj, Joshua da Silva Wicket video

Mohammed Siraj, West Indies vs India: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन मध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कॅरेबियन खेळाडूंनी टीम इंडियाची डोकेदुखी वाढवलीये. पहिल्या डावात 438 धावा करुन भारत चांगल्या परिस्थितीत होता. मात्र, वेस्ट इंडिजने पहिल्या डावात आत्तापर्यंत चिवट फलंदाजी केलीये. त्यामुळे आता चौथ्या दिवशी रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय. दोन दिवसात सामना कसा जिंकायचा असा प्रश्न आता कॅप्टन रोहितला पडला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) घातक गोलंदाजी केली. त्याचाच एक व्हिडीओ (viral video) सध्या व्हायरल होत आहे.

किंग कोहलीच्या (Virat Kohli) धमाकेदार 121 धावाच्या खेळीनंतर भारताने 438 धावा केल्या. त्यानंतर आता ब्रेथवेटच्या 75 धावाच्या संयमी खेळीमुळे वेस्ट इंडिजने चांगली सुरूवात केलीये. सध्या अलिक अथनाझे आणि जेसन होल्डर मैदानात आहेत. जोशुआ दा सिल्वा फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज सामना जिंकू देणार नाही, असं चित्र असताना मोहम्मद सिराजने कमाल केली. सिराजच्या घातक गोलंदाजीने सामन्याचं पारडं फिरलं. 

वेस्ट इंडिजच्या डावातील 98 वी ओव्हर सिराजकडे सोपवण्यात आली. दुसऱ्या चेंडूवर सिराजने शानदार इनस्विंगर टाकला. त्यावेळी जोशुआ दा सिल्वा फलंदाजी करत होता. सिराजच्या इनस्विंगने सिल्वाला बॉल समजला नाही आणि थेट स्टंप्सवर जाऊन आदळला. सिराजने थेट मिडल स्टंप्स उडवले. आपलाच ड्रीम बॉल पाहून सिराजला आनंद झाला. त्याने रोनाल्डो सिग्नेचर स्टाईलने जल्लोष केला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

पाहा Video

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन 

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.

आणखी वाचा - IND VS PAK | फायनलमध्ये भारतासमोर 353 धावांचं आव्हान; पाकिस्तानच्या Tayyab Tahir ने ठोकलं शतक!

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.