लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

नागपूर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार यावर उत्तर दिलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 17, 2024, 02:36 PM IST
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती title=

राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीच्या सरकारला भरघोस मतं मिळाली. महायुतीच्या या विजयात लाडक्या बहीण योजनेत खूप मोठा पाठिंबा असल्याच सांगण्यात येत आहे. या सगळ्याबरोबर आता लाडक्या बहीण योजनेत महिलांना किती पैसे मिळणार तसेच निकष लावून पैसे दिले जाणार, अशी चर्चा आहे. असं लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार? असा देखील राज्यातील लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे. या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची 

1400 कोटी रुपयांचा निधी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद केल्याच सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना दिली जाणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये इतकी केली आहे. हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेबाबत घेतला गेलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. जो अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला गेला. 

(हे पण वाचा - नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात; तब्बल 1400 कोटी रुपये...) 

पैसे कधी जमा होणार 

नागपुरात सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी लाडक्या बहीण योजेनेतील डिसेंबरच्या हप्त्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सोमवारीच पुरवणी यादीमध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहीण योजेनेची रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये केली. पण यावेळी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांबाबत काही निकष ठरवण्यात आले आहेत. हे निकष तपासून महिलांना पैसे दिले जाणार आहे. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा देखील प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे. 

(हे पण वाचा - लाडकी बहीण योजनेसंदर्भात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; CM फडणवीसांना म्हणाले 'सर्व निकष...')

सरकारच्या या निर्णयावर उद्धव ठाकरेंची टीका

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारने घेतलेल्या या निर्णयावर टीका केली आहे. लाडक्या बहीण योजनेत कोणतेही निकष न लावता सरसकट 2100 रुपये देण्याची मागणी केली आहे.