पाकिस्तान क्रिकेट समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर

पाकिस्तान क्रिकेटवर सध्या टीका सुरु आहे.

Updated: Jun 20, 2019, 09:04 PM IST
पाकिस्तान क्रिकेट समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर title=

इस्लामाबाद : मोहसिन खान यांनी पीसीबी क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा आता मंजूर करण्यात आला आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेटवर देशातील चाहत्यांकडून संताप व्यक्त होत आहे.  टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवाचे पडसाद पाकिस्तानात पाहायला मिळत आहे. पाकिस्तानी खेळाडू पासून अधिकाऱ्यांवर देशाभरातून टीका होत आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मोहसिन खान यांनी पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांच्याकडे केली होती. मोहसिन यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. मोहसिन खान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर वसीम खान पीसीबीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.  

 

 

 

 

पीसीबीचे मानले आभार

मोहसिन खान यांनी यावेळी पीसीबीचे आभार मानले. मला या पदाची जबाबदार दिली यासाठी मी एहसान मनी यांचा ऋणी आहे. मी यापुढे ही पाकिस्तान टीमसाठी उपलब्ध राहिलंच. असेही मोहसिन खान म्हणाले.

पीसीबी अध्यक्षांकडून कौतुक

पीसीबीचे अध्यक्ष एहसान मनी यांनी मोहसिन खान यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, 'मोहसिन कर्तुत्वान आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. पाकिस्तान टीमसाठीचे त्यांचे योगदान अमूल्य आहे.'

पाकिस्तानची खराब कामगिरी

टीम पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण ५ सामने खेळले आहेत. यातील १ सामना पावसामुळे रद्द झाला. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानला केवळ १ सामना जिंकता आला. टीम पाकिस्तानचा पुढचा सामना २३ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.