टी 20 पाठोपाठ विराट कोहलीकडून वन डेचं कर्णधारपही गेलं

रोहित शर्माला डबल बोनस! टी 20 पाठोपाठ विराट कोहलीकडून वन डेचं कर्णधारपद गेलं

Updated: Dec 8, 2021, 08:41 PM IST
टी 20 पाठोपाठ विराट कोहलीकडून वन डेचं कर्णधारपही गेलं title=

मुंबई: दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी क्रीडा विश्वातून सर्वात मोठी बातमी येत आहे. विराट कोहलीच्या हातून टी 20 पाठोपाठ आता वन डेचं कर्णधारपदही गेलं आहे. टीम इंडियाला आता वन डे फॉरमॅटसाठी नवा कर्णधार मिळाला आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता कसोटी फॉरमॅटसाठी विराट कोहली कर्णधार राहील. तर वन डे फॉरमॅटसाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डे सीरिजसाठी रोहित शर्मा नवा कर्णधार असणार आहे. 

न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सामन्यात रोहित शर्मा कर्णधार

न्यूझीलंड विरुद्ध 3 टी 20 सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला टी 20 सीरिज जिंकण्यात यश मिळालं. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रापूर्वी विराट कोहलीनं आपलं बंगळुरू संघाचं आणि टी 20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली होती. 

विराट कोहलीच्या हातून आता वन डेचं कर्णधारपदही काढून घेण्यात आलं आहे. आता फक्त कसोटी फॉरमॅटचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर अजिंक्य रहाणेला कसोटी फॉरमॅटमध्ये मोठी दणका बसला आहे. त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेतलं आहे. 

कसोटी फॉरमॅटमध्ये यापुढे उपकर्णधार म्हणून रोहित शर्माच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित शर्माला डबल बोनस मिळालाय असं म्हणायला हरकत नाही.