सारा तेंडुलकरच नाही तर, या भारतीय क्रिकेटर्सच्या मुलींचीही सर्वत्र चर्चा, जाणून घ्या यादी

सोशल मीडियावरच काय तर मीडियामध्येही चर्चेत असतात.

Updated: Dec 8, 2021, 05:57 PM IST
सारा तेंडुलकरच नाही तर, या भारतीय क्रिकेटर्सच्या मुलींचीही सर्वत्र चर्चा, जाणून घ्या यादी

मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आहे. सारा तेंडुलकरने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. सारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सारा अनेकदा तिच्या पोस्टमुळे चर्चेत येते. परंतु सारा तेंडुलकर ही क्रिकेटरची अशी एकटीच मुलगी नाही जिची इतकी चर्चा होत आहे. सारा शिवाय अनेक असे क्रिकेटर आहेत, ज्यांच्या मुलींची चर्चा नेहमीच सोशल मीडियावरती होत असते.

सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील गोंडस मुली आहेत, ज्या सोशल मीडियावरच काय तर मीडियामध्येही चर्चेत असतात.

सारा तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही इंग्लंडमध्ये राहते. मात्र, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या उपक्रमांची माहिती देत​असते. ती अनेकदा तिची स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

याशिवाय ती काही अंतराने फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने असाच डेट नाईट स्टोरी असलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. साराचे इन्स्टाग्रामवर 16 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

जीवा सिंग धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवा सिंग धोनी अवघ्या 6 वर्षांची आहे. 6 फेब्रुवारी 2015 रोजी जन्मलेली जीवा ही खुप चुलबूली मुलगी आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 दरम्यान वडिलांना चेअर करताना आणि वडिलांच्या विजयाचा आनंद व्यक्त करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्यादरम्यान जीवाच्या या आनंदाची सर्वत्र चर्चा होत आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर विजेत्याच्या ट्रॉफीसोबतचा जीवाचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जीवाने एक जाहिरात देखील केली आहे. ती यापूर्वी तिच्या वडिलांसोबत ओरियो बिस्किटांच्या जाहिरातीत दिसली होती. एवढेच नाही तर तिचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाउंट आहे, जे ब्लू टिक आहे. तिचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे फॉलोअर्स सारापेक्षा देखील जास्त आहे.

समायरा शर्मा

रोहित शर्माच्या मुलीचे नाव समायरा शर्मा आहे. समायराचा जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झाला होता. समायराही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. मग तो जसप्रीत बुमराहसारखा अभिनय करतानाचा व्हिडीओ असो किंवा मग आपल्या वडीलांची सोशल मीडिया मॅनेजर बनल्याचा व्हिडीओ असो. प्रत्येक वेळी समायराची पोस्ट चर्चेचा विषय बनत असते.

समायराचं सोशल मीडियावर अकाऊंट नसलं तरी, पण रोहित आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांनी शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ बहुतेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

वामिका कोहली

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने 11 जानेवारी 2021 रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. वामिका अजून एक वर्षाचीही नाही, पण ती खूप लोकप्रिय आहे. विराट आणि अनुष्काने अद्याप मुलगी वामिकाचा चेहरा दाखवलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

अलीकडेच विराट कोहलीचा एका लहान मुलीसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चाहत्यांना वाटले की त्याची मुलगी वामिका विराटच्या मांडीवर आहे. मात्र, हा फोटो विराटच्या मुलीचा नसून हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसराची मुलगी हिनायाचा होता.

सना गांगुली

इंडियन टीमचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुलीही सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचे केंद्र बनली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या टीम इंडियाच्या पहिल्या पिंक बॉल टेस्टनंतरही ती प्रसिद्धीच्या झोतात आली.