MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!

BCCI Ethics Committee Inquiry:  महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Aug 11, 2024, 10:56 AM IST
MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण! title=
MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल

Complaint against MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी वेदनादायक बातमी आहे. कारण प्रत्येकवेळी आपल्या खेळातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणारा धोनी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय. महेंद्रसिंह धोनीच्या विरोधात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट'ची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या नियम 39 अंतर्गत बोर्ड ऑफ इथिक्समध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी विरोधात तक्रार दाखल करणारे राजेश कुमार मौर्य हे उत्तर प्रदेशच्या अमेठीतील रहिवाशी आहेत. महेंद्रसिंग धोनीची फसवणूक झाल्याची एक केस कोर्टात सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय चौकशी समितीकडून धोनीकडे उत्तर मागण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 15 कोटी रुपयांच्या फसवणुकी संदर्भात आहे. एमएस धोनीने रांचीच्या सिव्हिल कोर्टात मिहिर दिवाकर नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली होती.बीसीसीआयच्या इथिक्स समितीने यासंदर्भात धोनीकडे 30 ऑगस्टच्या आधी उत्तर मागितलंय. तसेच राजेश कुमार मौर्य यांनादेखील 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलंय. 

कोणी केली धोनीची फसवणूक?

रांची सिव्हिल कोर्टामध्ये मिहिर दिवाकर नावाच्या व्यक्तीच्या विरोधात एमएस धोनीने फसवणुकीची तक्रार केली आहे. यामध्ये मिहिर दिवाकर यांच्यासोबतच सौम्या दास आणि आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड विरोधातही फसवणुकीचा आरोप केलाय. हे सर्वजण धोनीसोबत व्यवसाय करत होते. यांनी धोनीची 15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय. 

धोनीला 15 कोटींचं नुकसान?

20 मार्च 2024 रोजी याप्रकरणाची सुनावणी झाली. रांची सिव्हिल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. यात मिहिर दिवाकर, सौम्या दास आणि आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला समन्स पाठवण्यात आलं. मिहिर दिवाकर यांनी कराराचे पालन केले नाही. करार 2021 मध्ये संपला होता. तरीही मिहिर दिवाकर यांची कंपनी आरका स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड धोनीच्या नावाचा उपयोग करत होती, अशी बाजू धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी मांडली. मिहिर यांच्या कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक अकादमी उघडल्या आहेत. असे असतानाही ते धोनीला त्यातील फायद्याचा कोणताच भाग देत नाहीत. यामुळे धोनीला साधारण 15 कोटींचे नुकसान झाल्याचे वकिलांनी म्हटले.