...जेव्हा सचिननं धोनीची तुलना आपल्या वडिलांसोबत केली!

टीम इंडियाचे दोन माजी कॅप्टन... सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची मैदानावरची दमदार केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली... पण, मजेची गोष्ट म्हणजे धोनी ज्या सचिनचा फॅन आहे... तोच सचिन धोनीचा फॅन आहे.

Updated: Nov 3, 2017, 05:14 PM IST
...जेव्हा सचिननं धोनीची तुलना आपल्या वडिलांसोबत केली! title=

मुंबई : टीम इंडियाचे दोन माजी कॅप्टन... सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांची मैदानावरची दमदार केमिस्ट्री सगळ्यांनीच पाहिली... पण, मजेची गोष्ट म्हणजे धोनी ज्या सचिनचा फॅन आहे... तोच सचिन धोनीचा फॅन आहे.

धोनीचं कौतुक करण्यासाठी सचिननं वापरलेले शब्द क्वचितच कुणी आपल्यापेक्षा वयानं आणि अनुभवानं लहान असलेल्या व्यक्तीसाठी वापरले असतील. सचिननं धोनीची तुलना चक्क आपल्या वडिलांशी केलीय... आणि त्याची हीच खासियत त्याला महान खेळाडू आणि महान व्यक्ती बनवते. 

'धोनीनं मला नेहमीच योग्य मान दिलाय... मला धोनीला पाहून माझ्या वडिलांची आठवण होते... तेही असेच होते... विजय असो किंवा पराभव... नेहमी शांत... धोनी विजय-पराभवात सारखाच राहतो... आणि हेच आम्हाला आमचे वडिलही शिकवत होते...' असं सचिननं म्हटलंय. 

मुख्य म्हणजे, सचिनच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचा मोठा प्रभाव राहिलाय. १९९९ वर्ल्डकप दरम्यान सचिनच्या वडिलांचं निधन झालं होतं. 
 
धोनीच्या कॅप्टन्सीच्या काळात तब्बल २८ वर्षानंतर २०११ साली टीम इंडियानं वर्ल्डकप जिंकला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या टीमचाच एक भाग होता. सचिननं 'बेस्ट कॅप्टन'चा खिताब केव्हाच महेंद्रसिंग धोनीला देऊन टाकलाय.