महेंद्रसिंह धोनी ते श्रेयस अय्यर IPL मधील 10 टीमच्या कर्णधारांचे पगार पाहून व्हाल थक्क

महेंद्रसिंह धोनीपेक्षाही या टीमच्या कर्णधाराला मिळतोय जास्त पगार, यादीमध्ये सर्वात टॉपचं नाव वाचून तुम्ही व्हाल हैराण

Updated: Mar 21, 2022, 09:09 AM IST
महेंद्रसिंह धोनी ते श्रेयस अय्यर IPL मधील 10 टीमच्या कर्णधारांचे पगार पाहून व्हाल थक्क title=

मुंबई : आयपीएल 2022 च्या 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. मुंबई आणि पुण्यामध्ये सर्व सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील 3 स्टेडियम आणि पुण्यातील 1 स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. यंदाच्या आयपीएलसाठी टाटा टायटल स्पॉन्सर असणार आहे. 

मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंना किती रुपये देऊन संघाने घेतलं हे सर्वांना कळलं पण उत्सुकता असते ती कर्णधाराच्या पगाराची. प्रत्येक संघाच्या कर्णधाराला किती पगार असतो? सगळ्या संघांच्या कर्णधाराचे पगार सारखे असतात का? या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. 

यंदा अनेक बदल आयपीएलमध्ये झाले आहेत. त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संघाचे कर्णधार बदलले आहेत. शिवाय दोन नवे संघ यंदा मैदानात उतरणार आहेत. बंगळुरू संघाची धुरा विराटनंतर धोनीचा खास खेळाडू फाफ डु प्लेसिसकडे आहे. तर पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल असणार आहे. कोलकाताची धुरा श्रेयस अय्यरकडे देण्यात आली आहे. 

लखनऊ फ्रान्चायझीने टीमच्या कर्णधाराला सर्वात जास्त पगार दिला आहे. हार्दिक पांड्याला 17 कोटी रुपये दिले आहेत. तर त्या खालोखाल मुंबई, दिल्ली संघाच्या कर्णधाराचे पगार आहेत. त्यानंतर पंजाब, हैदराबाद, राजस्थान संघाच्या कर्णधाराला 14 कोटी रुपये मिळतात. तर धोनीला 12 कोटी रुपये पगार मिळतो. महेंद्रसिंह धोनीपेक्षा रोहित शर्मा, केन विल्यमसन, हार्दिक पांड्याला जास्त पगार त्यांचे संघ देतात. 

10 टीमच्या कर्णधाराला पगार किती?

मुंबई संघ - कर्णधार रोहित शर्मा, पगार - 16 कोटी रुपये
चेन्नई संघ- कर्णधार महेंद्रसिंह धोनी, पगार-12 कोटी
बंगळुरू संघ- कर्णधार फाफ डु प्लेसिस, पगार 7 कोटी
दिल्ली संघ - कर्णधार ऋषभ पंत, पगार 16 कोटी
कोलकाता संघ - कर्णधार श्रेयस अय्यर, पगार 12.25 कोटी रुपये
पंजाब संघ - कर्णधार मयंक अग्रवाल, पगार 14 कोटी रुपये
हैदराबाद संघ - कर्णधार केन विल्यमसन, पगार 14 कोटी रुपये
राजस्थान संघ - कर्णधार संजू सॅमसन, पगार 14 कोटी रुपये
गुजरात संघ - कर्णधार हार्दिक पंड्या, पगार 15 कोटी रुपये
लखनऊ संघ - कर्णधार केएल राहुल, पगार 17 कोटी रुपये