MS Dhoni चा हा लूक तुम्हाला आवडो न आवडो पण त्याच्या मुलीनं तर...फोटो व्हायरल

MS Dhoni च्या हा लूक तुम्हाला आवडला असेल पण त्याचा मुलाला कसा वाटला? मुलीनं दिली रिएक्शन, पाहा फोटो

Updated: Jun 24, 2021, 11:44 AM IST
MS Dhoni चा हा लूक तुम्हाला आवडो न आवडो पण त्याच्या मुलीनं तर...फोटो व्हायरल title=

मुंबई: धोनी आपले वेगवेगळे लूक करत असतो. 4 मे रोजी कोरोनामुळे आयपीएल स्थगित झाल्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सध्या माही आपल्या कुटुंबासोबत हिमाचलमध्ये आहे. तिथे कुटुंब सुट्ट्यांचा आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळत आहे. धोनी आणि साक्षीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. पण त्यातला एक फोटो सध्या खूप चर्चेत आहे.

धोनी दरवेळी आपले लूक बदलत असतो. चाहत्यांना देखील त्याचे लूक खूप आवडतात. त्याचा यावेळचा लूक काहीसा वेगळा आहे. माहीने यावेळी हलकी दाढी आणि मिशा वाढवल्या आहेत. त्याचा हा नवा लूक सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना आवडला आहे. तर दुसरीकडे झीवा धोनीच्या मिशांकडे कुतुहलाने पाहतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

धोनीच्या नव्या लूककडे झीवा कुतूहलाने पाहत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. धोनीच्या या नव्या लूकने चाहतेही थोडे हैराण झाले आहेत. याआधी साक्षी धोनीने हिमाचलमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

महेंद्रसिंह धोनीनं नुकतंच पोनी नावाचा घोडा आपल्या मुलीला गिफ्ट केला आहे. हा घोडा स्कॉटलंडवरून मागवण्यात आला होता. झीवाचे पोनी आणि श्वानासोबतचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.