दिल्ली : सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता दुपारच्या 2 वाजण्याकडे लागलंय. अर्थात याचं कारण म्हणजे महेंद्रसिंग धोनी. सोशल मीडियावर (Social Media) सध्या चर्चा होत असतानाच आता धोनीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे सर्वांनाच टेन्शनमध्ये टाकलंय. आज लाईव्ह (MS Dhoni Live) येऊन मोठी घोषणा करणार असल्याचं धोनीने सांगितलं आहे. त्याचा फोटो देखील धोनीने शेअर केला आहे. दरम्यान धोनी कोणता मोठा निर्णय घेणार हे तुम्ही झी 24 तासच्या फेसबूकवरही पाहू शकता.
"मी तुमच्यासोबत एक बातमी शेअर करणार आहे. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन मी ही माहिती देईन. मला आशा आहे की तुम्ही सर्व तिथे असाल.", अशी पोस्ट धोनीने त्याच्या ऑफिशयल अकाऊंटवरून शेअर केली आहे.
धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मागच्या आयपीएलवेळी धोनीने निवृत्ती घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, धोनीला चेन्नईच्या मैदानावर निवृत्ती घेण्याची इच्छा आहे. तसं त्याने बोलून देखील दाखवलं होतं.
दरम्यान, आज धोनी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय. असं झालं तर, धोनी पुन्हा मैदानावर दिसणार नाही, याची खंत चाहत्यांच्या मनात कायम राहील.