हैदराबाद : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा टी-20 सामना 6 विकेट्सने जिंकला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना हैदराबादच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका काबीज करायची आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. यासाठी कर्णधार रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. तो खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
भारताचा स्टार गोलंदाज हर्षल पटेल टीम इंडियात परतला आहे. पण आपल्या गोलंदाजीने छाप पाडण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरलाय. डेथ ओव्हर्समध्ये त्याने चांगली कामगिरी केली नाही. टीम इंडियासाठी तो सर्वात मोठा कमजोरी ठरला आहे. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या टी-20 सामन्यात दीपक चहरला संधी देऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात हर्षल पटेलने 4 ओव्हर्समध्ये 49 रन्स दिले. यानंतर दुसऱ्या टी-20 सामन्यातही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. दुसऱ्या सामन्यात त्याने 2 ओव्हर्समध्ये 32 रन्स दिले. दुसरीकडे, दीपक चहर चांगल्या फॉर्ममध्ये असून नवीन चेंडूचा चांगला वापर करतो. यापूर्वीही चहरने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकलेत.
ऑस्ट्रेलिया सीरीजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि जसप्रीत बुमराह.