मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजीनामासत्र सुरूच

 दिनेश नानावाटी यांच्या राजीनाम्यानंतर आता फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक  रमेश पोवार यांनीही राजीनामा दिलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 16, 2018, 03:37 PM IST
मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजीनामासत्र सुरूच title=

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राजीनामासत्र सुरूच आहे. दिनेश नानावाटी यांच्या राजीनाम्यानंतर आता फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक  रमेश पोवार यांनीही राजीनामा दिलाय.

पोवारांचा रोख एमसीए अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर

एमसीएचं काम दिशाहीन सुरू असल्याची टीका पोवार यांनी केलीय. त्यामुळं पोवारांचा रोख एमसीए अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर असल्याची चर्चा सुरू आहे. 

कामाचं स्वातंत्र्य देत नसल्याची टीका

कामाचं स्वातंत्र्य देत नसल्याची टीका करत आशिष शेलार निदान नव्या प्रशिक्षकांना तरी कामाचं स्वातंत्र्य देतील, असा टोलाही रमेश पोवारांनी लगावला आहे.