एकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते

सध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते. 

Dakshata Thasale Updated: Apr 11, 2018, 10:27 AM IST
एकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते  title=

मुंबई : सध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते. 

काय आहे या व्हिडिओत ?

या व्हिडिओत एक मुलगा टी 20 च्या पहिल्या सामन्यात असल्याचं कळतंय. त्या व्हिडिओत हा मुलगा सुरूवातीला रोहित शर्माच्या मुंबई संघाला सपोर्ट करत आहे. अगदी सुरूवातीला तो मुंबईच्या संघाला ओरडून ओरडून सपोर्ट करतो. पण ज्या क्षणी मैदानावर चेन्नई सुपरकिंग्सचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी येतो तेव्हा या व्हिडिओतील मुलगा मुंबईच्या जर्सीवर चेन्नईची जर्सी घालतो आणि धोनीला सपोर्ट करतो. सुरूवातीहा हा प्रकार मैदानावर उपस्थित असलेल्या क्रिकेट प्रेमींना विचित्र वाचतो. मात्र नंतर पुन्हा हा मुलगा चेन्नईची जर्सीकाढून मुंबईच्या संघाला सपोर्ट करतो.