इतरांना संधी, मग याला का नाही? आयर्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी निवड न झाल्याने नेटकऱ्यांचा निवड समितीला संतप्त सवाल

टीम इंडिया (team india) सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळतेय. 

Updated: Jun 17, 2022, 04:24 PM IST
 इतरांना संधी, मग याला का नाही? आयर्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी निवड न झाल्याने नेटकऱ्यांचा निवड समितीला संतप्त सवाल title=

मुंबई : टीम इंडिया (team india) सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळतेय. त्यानंतर जूलै महिन्यात आयर्लंडशी टी-20 मालिकेत भिडणार आहे. या मालिकेत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संधी मिळण्याची आशा होती. मात्र काही खेळाडूंना संधी मिळालीय तर अनेक खेळाडूंना आयर्लंड विरूद्ध संधीच मिळाली नाहीय. त्यामुळे या खेळाडूंची निराशा झालीय. तसेच या निवडीवर नेटकरी संतप्त झाले असून निवड समितीसमोर अनेक सवाल उपस्थित करत आहेत.  

टीम इंडिया (team india)  पुढील महिन्यापासून (ireland tour) आयर्लंडशी टी-20 मालिकेत भिडणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. 
या संघात अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे, तर काहींचा प्रथमच  समावेश करण्यात आला आहे. मात्र या मालिकेत रोहित शर्माचा जोडीदाराला संधी मिळाली नाही. आफ्रिकेविरुद्धही त्याला संघात स्थान मिळण्याची आशा होती. मात्र आता आफ्रिकेनंतर आता आयर्लंड विरूद्द मालिकेतही त्याला संधी मिळाली नाही आहे.  

 आयर्लंड (ireland) विरुद्धच्या T20 मालिकेसाठी रोहितचा मुंबई इंडियन्समधला साथिदार 19 वर्षीय युवा फलंदाज तिलक वर्माचा समावेश करण्यात आलेला नाही. आयपीएल 2022 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी खूपच खराब होती, परंतु तिलक वर्माने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. मुंबईचे मोठे फलंदाज फ्लॉप ठरताना या खेळाडूने तुफानी खेळी करत पहिल्याच सत्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिलकने अनेक महत्त्वाच्या खेळी खेळल्या आणि संघासाठी सामने जिंकून दिले. पण त्याला निवडकर्त्यांचा विश्वास जिंकता आला नाही.

रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्माने (rohit sharma) नुकतेच आयपीएलमध्ये सांगितले होते की, तिलक वर्मा आगामी काळात टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळू शकतात. टीम इंडियाचे माजी दिग्गज सुनील गावस्कर यांनीही रोहित शर्माच्या या विधानाचे समर्थन केले होते, अशा परिस्थितीत रोहितच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये दिसणार अशी चर्चा होती. 

दरम्यान आयपीएलच्या आपल्या पहिल्याच हंगामात या खेळाडूने कमाल खेळी केली होती. हा खेळाडू आगामी काळात टीम इंडियाचा भविष्यातील स्टार खेळाडू ठरेल असेही बोलले जात होते. मात्र या खेळाडूकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.  

आयर्लंड टीम :
एंड्रयू बलबर्नी (कॅप्टन), मार्क अडायर, कर्टिस कँपर, गैरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, जोश लिटिल, एंड्रयू मॅकब्राइन, बॅरी मॅकार्थी, कॉनर ओल्फर्ट, पॉल स्टलिर्ंग, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर आणि क्रेग यंग.