नागपूरचा बॅडमिंटनपटू रोहन गुरबानीची भारतीय संघात निवड

नागपूरचा बॅडमिंटनपटू रोहन गुरबानी याची भारतीय संघात निवड. 

Updated: Sep 4, 2019, 08:54 AM IST
नागपूरचा बॅडमिंटनपटू रोहन गुरबानीची भारतीय संघात निवड

नागपूर : जिल्ह्यातील बॅडमिंटनपटू रोहन गुरबानी याची भारतीय संघात निवड झाली आहे. रशियातील कझान येथे  बीडब्लूएफ वर्ल्ड ज्युनिअर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धो होणार आहे. या १९ वर्षांखालील जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात रोहनची निवड झाली आहे. 

भारतीय संघातील एकेरीच्या चार खेळाडूंपैकी रोहन एक खेळाडू असणार आहे. ३० सप्टेंबर ते १३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या दोन स्पर्धांमध्ये रोहन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. 

देशांतर्गत रँकिंगमध्ये द्वितीय स्थानावर असलेल्य रोहनने अलिकडे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या आधारावरच रोहनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.