मी फार उदास होतो आणि पंतने...; नवदीप सैनीने सांगितली Rishabh Pant बाबतची अनटोल्ड स्टोरी

दुखापतीमुळे ऋषभ पंत आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाहीये. नवदीप सैनी हा पंतचा चांगला मित्र आहे. यावेळी नवदीप सैनीने पंतबद्दल एक खास स्टोरी शेअर केली आहे.

Updated: Apr 8, 2023, 08:16 PM IST
मी फार उदास होतो आणि पंतने...; नवदीप सैनीने सांगितली Rishabh Pant बाबतची अनटोल्ड स्टोरी title=

Navdeep Saini Shared Untold Story Of Rishabh Pant : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंतचा (Rishabh Pant) गंभीर अपघात झाला. या अपघातात पंत जखमी झाला होता. यानंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता रिकव्हर होतोय. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये झालेल्या आयपीएलच्या सामन्यात ऋषभ पंतने स्टेडियममध्ये उपस्थिती लावली होती. अशातच पंतच्या एका खास मित्राने त्याची एक अनटोल्ड स्टोरी (Navdeep Saini Shared Untold Story Of Rishabh Pant) सांगितली आहे. 

नवदीप सैनीने सांगितली अनटोल्ड स्टोरी

दुखापतीमुळे ऋषभ पंत आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाहीये. नवदीप सैनी हा पंतचा चांगला मित्र आहे. यावेळी नवदीप सैनीने पंतबद्दल एक खास स्टोरी शेअर केली आहे.

नवदीप सैनी म्हणाला, एका आयपीएलच्या दरम्यान नी अनसोल्ड राहिलो होतो. यावेळी मी फ्लाईटमध्ये होतो आणि माझ्यासोबत पंत देखील होता. कोणत्याही टीमने बोली न लावल्याने मी फार उदास होतो. पंत मला म्हणाला की, अनसोल्ड राहिलास तरी काही हरकत नाही. बोटं क्रॉस कर, जे होईल ते आपण बघून घेऊ.

त्यानंतर फ्लाईंट लँड झालं आणि त्यावेळी मला अचानक भरपूर मेसेज येऊ लागले. यामुळे मी हैराण झालो. मी सगळे मेसेज पाहिले आणि मला कळलं की दिल्ली कॅपिटल्सने मला त्यांच्या टीममध्ये घेतलं आहे, असंही सैनीने सांगितलं.

स्टेडियममध्ये पोहोचला ऋषभ पंत

मंगळवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगला होता. पंतने या सामन्याला उपस्थिती लावली होती. ऋषभ पंतने स्टेडियममध्ये बसून गुजरात विरूद्ध दिल्ली असा सामना पाहिला. त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. यावेळी त्याने टीमच्या सर्व खेळाडूंची भेट घेतली. 

मैदानावर कधी परतणार पंत?

डिसेंबर 2022 मध्ये ऋषभ पंतचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर तो आता रिकव्हर होतोय. त्यामुळे अजून काही काळ ऋषभ पंत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पंत 2023 च्या क्रिकेट विश्वचषकामध्येही खेळू शकणार नाहीये.