Arjun Tendulkar : अहमदाबादच्या स्टेडियममध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबईला 55 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. 208 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना मुंबईचे टॉप ऑर्डर फलंदाज चांगलेच फेल गेले. मात्र यावेळी प्रमुख खेळाडू सोडून इतर काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. यातील एक खेळाडू म्हणजे नेहल वढेरा (Nehal Wadhera). दरम्यान या खेळाडूचा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
गुजरात विरूद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच फलंदाजी केली. यावेळी अर्जुनने 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली. अर्जुनसोबत क्रीजवर नेहल वडेरा खेळत होता. मात्र क्रीझवर एक अशी घटना घडली, ज्यामुळे नेहल अर्जुन तेंडुलकरवर चांगलाच संतापलेला दिसला.
नेहल आणि अर्जुन क्रीझवर फलंदाजी करत असताना ही घटना घडली. वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या गोलंदाजीवर नेहलने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला हा शॉट खेळणं जमलं नाही. यावेळी बॉल काहीसा दूर गेला. अशा वेळी रन मिळावा म्हणून नॉन स्टायकर एंडवरून अर्जुन धावला. मात्र अर्ध्यावर अर्जुन पोहोचल्यावर नेहलने रनसाठी नकार दिला. मात्र तिथे फिल्डर नसल्याने नेहलने धावून रन घेतला.
या सर्व प्रकारानंतर नेहल अर्जुनवर चांगलाच वैतागलेला दिसला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुळात नेहल स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छित होता. मात्र अर्जुन रन काढण्याच्या नादात धावला. जर बॉल मारलेल्या ठिकाणी फिल्डर उभा असता, तर नेहल रन आऊट झाला असता. याच कारणाने नेहल चांगलाच संतापला आणि भर मैदानात अर्जुनकडे रागाने पाहिलं.
— binu (@sachhikhabars) April 25, 2023
मंगळवारी झालेल्या सामन्यात अर्जुनने चांगली गोलंदाजी केली. त्याने 2 ओव्हर्स फेकत 1 विकेट देखील काढली. याशिवाय या सामन्यात अर्जुनने फलंदाजी देखील केली. त्याने 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये त्याने एक उत्तुंग सिक्स लगावला. हा सिक्स बघितल्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता.