मुंबई : क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर भारतीय गोलंदाज आशीष नेहरा यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे.
नेहराला वाटतं की, धोनी 2020 टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळू शकतो. नेहराने म्हटलं की, 'माजी कर्णधाराला तोपर्यंत खेळायला पाहिजे, जोपर्यंत तो फिट आहे. प्रत्येक घरात एक मोठ्या व्यक्तीची गरज असते. टीम इंडियामध्ये असा अनुभवी धोनी आहे. मी आशा करतो की पुढील 2-3 वर्ष तो खेळेल. जोपर्यंत ते शारीरिक रूपाने फीट आहेत. क्रिकेट परिस्थितीचा खेळ आहे. यामध्ये खेळणं सोपं नाही.'
नेहरा म्हणाला की, 'जर मी कोच किंवा कप्तान असतो तर धोनीला बोललो असतो की तुला खेळायचंच आहे. मी असं नाही म्हणत आहे की तो चांगली कामगिरी नाही करत आहे आणि त्याला खेळायचंच आहे. जर तो चांगलं प्रदर्शन नाही करु शकत असेल तर तो स्वत:च आधी बोलले की मला आता रिटायर झालं पाहिजे. वैयक्तिकरित्या माझं मत आहे की, ते धोनीवर सोडून द्यायला पाहिजे. त्याला क्रिकेट खेळायला दिलं पाहिजे.'