WI vs NED: 6,6,6,6,6... थरारक सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने लावला वेस्ट इंडिजचा निकाल; पाहा Video

ICC World Cup Qualifier: वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्स (WI vs NED) यांच्यात सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक पात्रता 2023 मधील 18 वा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आहे. दोन्ही संघांनी निर्धारित 50-50 षटकात 374 धावा केल्या आहेत.

Updated: Jun 26, 2023, 10:40 PM IST
WI vs NED: 6,6,6,6,6... थरारक सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने लावला वेस्ट इंडिजचा निकाल; पाहा Video title=
WI vs NED ICC World Cup Qualifier

West Indies vs Netherlands: यंदा भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे (ICC World Cup Qualifier) सामने खेळवले जात आहेत. या फेरीतील 18 वा सामना वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्स (WI vs NED) या दोन संघात पार पडला. त्यावेळी नेदरलँडने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवल्याचं पहायला मिळतंय. वेस्ट इंडिजने 374 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना नेदरलँड्स देखील 374 धावा करता आल्या. सामना सुपर ओव्हरमध्ये (Super Over) गेल्यावर नेदरलँड्सने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला. त्याचबरोबर नेदरलँडने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं असून वेस्ट इंडिजची वाट पुसट झाल्याचं दिसत आहे.

प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरनच्या (Nicholas Pooran) झंझावाती शतकाच्या जोरावर कॅरेबियन संघाने 374 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड संघालाही निर्धारित 50 ओव्हरमध्ये तेवढ्याच धावा करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. 2023 च्या विश्वचषक पात्रता फेरीतील ही पहिली सुपर ओव्हर होती. नेदरलँड्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना एकाच ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा चोपल्या.

सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडचा फलंदाज व्हॅन बीकने (Logan van Beek) जेसन होल्डरच्या षटकात 30 धावा तडकावल्या आणि नेदरलँडचा मार्ग सोपा केला. या ओव्हरमध्ये त्याने तीन चौकार आणि दोन गगनचुंबी षटकार लगावले. व्हॅन बीकच्या या आक्रमक खेळीचं सर्वजण कौतूक करताना दिसत आहेत. आता वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज होती. त्याचवेळी नेदरलँडच्या गोलंदाजाने कमाल केली.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, विंडीजचा संघ सुपर ओव्हरमध्ये (WI vs NED Super Over)  केवळ 8 धावाच करू शकला आणि नेदरलँड्ससाठी व्हॅन बीक चमकला. बेकने सुपर ओव्हरमध्ये दोन गडी बाद केले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहास टाय होणारी ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. सामना जिंकल्यानंतर काही खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं. नेदरलँडच्या खेळाडूंसाठी हा भावनिक क्षण होता.