भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पुन्हा मौका-मौका

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे.

Updated: May 30, 2017, 09:11 PM IST
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पुन्हा मौका-मौका title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे. या महामुकाबल्याची मोर्चेबांधणी आता सोशल नेटवर्किंगवर सुरू झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तानच्या मॅच आधी मौका-मौका हे गाणं आलं आहे.

२०१५च्या वर्ल्ड कपपासून मौका-मौका या गाण्यांच्या सीरिजला सुरुवात झाली. वर्ल्ड कपनंतर मागच्या वर्षी भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही मौका-मौकाची सीरिज प्रचंड लोकप्रिय झाली. या दोन्ही वेळी स्टार स्पोर्ट्सकडून मौका-मौकाचं थिम साँग प्रसिद्ध करण्यात आलं होतं.