मुंबई : न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनला कोरोनाची लागण झाली आहे. विल्यमसनची रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आढळली होती. त्यामुळे आता 5 दिवस विल्यमसन अलगीकरणात आहे. या घटनेने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून विल्यमसनला बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
किरकोळ लक्षणे दिसल्यानंतर गुरुवारी विल्यमसनने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमध्ये तो पॉझिटीव्ह आढळून आला होता. आता तो पाच दिवस अलगीकरणात आहे. या घटनेने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. कारण शुक्रवारपासून ट्रेंटब्रिज येथे सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला त्याला मुकावे लागणार आहे.
टॉम लॅथमला कॅप्टन्सी
केन विल्यमसन कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने न्यूझीलंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टॉम लॅथमकडे देण्यात आली आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार आहे.
हॅमिश रदरफोर्ड संघात संघी
विल्यमसनने रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने त्याला पाच दिवस अलगीकरणात ठेवले आहे. संघातील उर्वरित सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी याबाबत माहिती दिली. तर आता विल्यमसनच्या जागी हॅमिश रदरफोर्ड संघात असणार आहे. दरम्यान एवढ्या महत्त्वाच्या सामन्याच्या पूर्वसंध्येला केनला माघार घ्यावी लागली हे निराशाजनक असल्याचे गॅरी स्टीड यांनी म्हटले. हामिश याआधी कसोटी संघात होता आणि सध्या व्हिटॅलिटी टी-२० ब्लास्टमध्ये लीसेस्टरशायर फॉक्सकडून खेळत आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला ५ विकेट्सने दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्या सामन्यात जो रूटच्या शानदार शतकाच्या (नाबाद 115) बळावर न्यूझीलंडने हा विजय मिळवला होता. या शतकी खेळीदरम्यान रुटने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.