न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान

तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे. 

Updated: Nov 7, 2017, 10:11 PM IST
न्यूझीलंडसमोर विजयासाठी ६८ धावांचे आव्हान

तिरुअनंतपुरम : तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे. 

तब्बल ३० वर्षानंतर खेळवण्यात येत असलेल्या स्टेडियमवर पावसाने खोडा घातला आणि सामना उशिराने सुरु झाला. ८ षटकांचा सामना खेळवण्यात येतोय. 

न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीस बोलावले. भारताने ८ षटकांत ५ गडी गमावताना ६७ धावा केल्या. भारताकडून एकाही फलंदाजांला चांगला कामगिरी करता आली नाही.