क्वीन्सटाउन : भारत आणि न्यूझीलंड महिला संघ ( INDW vs NZW ) यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडियाची स्टार फलंदाज स्मृती मानधना क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून संघात परतली. मात्र सामन्यात तिला काही खास कामगिरी करता आली नाही. पण क्षेत्ररक्षणात तिने असा चमत्कारिक झेल घेतला. जे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ( Smriti Mandhana Stunning Catch )
स्मृती मानधना (Smriti Mandhan) हिने घेतलेला हा कॅच आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने न्यूझीलंडच्या महिला संघाच्या दोन्ही सलामीवीर सोफी डेव्हाईन आणि सुझी बेट्स यांनी एकत्र झटपट सुरुवात केली आणि पहिल्या 6 षटकात 50 धावा जोडल्या. पण, डावाच्या 6व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर स्मृती मानधनाने सोफी डिव्हाईनचा झेल घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
रेणुका सिंग ही भारतीय संघासाठी सहावी ओव्हर टाकत असताना तिच्या शेवटच्या बॉलवर डेव्हीनने ऑफ-साइडमध्ये शानदार चौकार मारण्याचा विचार केला. मात्र, 30 यार्डांच्या आत क्षेत्ररक्षण करणाऱ्या मंधानाने बॅकवर्ड पॉइंटवर हवेत झेप घेत सर्वांना आश्चर्यचकित केले.
चौथ्या सामन्यातील हा पराभव या दौऱ्यातील सलग पाचवा पराभव आहे. याआधी भारतीय संघाचा एकमेव टी-20 सामन्यातही पराभव झाला होता. पावसामुळे हा सामना 20 षटकांचा करण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत न्यूझीलंड महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. अमेलिया केरने 33 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी खेळली. सुझी बेट्सने 41, डिव्हाईनने 32 धावा केल्या.
प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 128 धावांवरच ऑलआऊट झाला. संघाकडून युवा फलंदाज ऋचा घोषने 52 आणि कर्णधार मिताली राजने 30 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांमध्ये केवळ स्मृती मानधनाच दुहेरी आकडा गाठू शकली. तिने 15 धावा केल्या.