निकोलस पूरनचं 17 बॉलमध्ये अर्धशतक, विशेष क्‍लबमध्ये झाला सहभागी

निकोलस पूरनची शानदार खेळी... 

Updated: Oct 9, 2020, 06:17 PM IST
निकोलस पूरनचं 17 बॉलमध्ये अर्धशतक, विशेष क्‍लबमध्ये झाला सहभागी title=

दुबई : किंग्ज इलेव्हन पंजाबचा बॅट्समन निकोलस पूरनने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फक्त 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. पूरन यानंतर एका खास क्लबचा भाग बनला आहे. आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक झळकावण्याबाबत पंजाबचा कर्णधार केएल राहुल याबाबत आघाडीवर आहे. राहुलने 2018 मध्ये दिल्ली संघाच्या विरूद्ध अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

निकोलस पूरनने 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. त्याच्या आधी आयपीएलमध्ये सात खेळाडूंना 17 बॉलमध्ये अर्धशतक ठोकले आहेत. पूरनच्या आधी केएल राहुल (14 बॉल), यूसुफ पठान (15 बॉल), सुनील नरेन (15 बॉल) आणि सुरेश रैना (16 बॉल) मध्ये अर्धशकत ठोकले आहे.

सनरायझर्स हैदराबादने 201 धावांचं टार्गेट दिल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि प्रबसिमरन सिंगच्या विकेट फक्त 58 धावांच्या आत गमावल्या. पाचव्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पूरनने सुरुवातीपासूनच दबाव येऊ दिला नाही. त्याने आक्रमक खेळी करत पंजाबला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याची विकेट गेल्यानंतर पंजाबच्या आशेचा किरणही डुबला.